Shah Rukh Khan KKR Won IPL 2024 : 'आयपीएल 2024'च्या (IPL 2024) अंतिम सामन्यात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खानने जल्लोष केला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि मुलांसोबत त्याने जल्लोष केला. शाहरुखला गेल्या सामन्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा शाहरुखकडे होत्या. शाहरुख खान अंतिम सामना पाहण्यासाठी गौरी खानसोबत आला होता. 


शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो गौरी खानसोबत दिसून येत आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी आणखी काही सेलिब्रिटींनीदेखील हजेरी लावली होती. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी सनरायजर्स हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 113 धावांवर बाद केलं. यानंतर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि रहमानुल्लाह गुरबाझनं दमदार फलंदाजी करत केकेआरचा विजय सोपा केला. 






शाहरुख-गौरीचे 'IPL 2024'च्या ट्रॉफीसोबतचे फोटो व्हायरल 


शाहरुख खान आणि गौरी खानचे 'आयपीएल 2024'च्या ट्रॉफीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर जिंकण्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. केकेआर जिंकल्यानंतर सर्वत्र शाहरुख खान आणि त्याच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. किंग खानने ट्रॉफीसोबत फ्लाइंग किस पोझदेखील दिली आहे.


शाहरुखने गौरीला केलं KISS


'KKR'ने 10 वर्षानंतर 'आयपीएल 2024'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 'IPL 2024'चा अंतिम सामना पाहायला शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान यांनी हजेरी लावली होती. केकेआर विजयी झाल्यानंतर शाहरुखला आपला आनंद लपवता आला नाही. त्याने गौरी खानला किस केलं. दरम्यान सुहाना खानदेखील भावूक झालेली दिसून आली.






कोलकाता 10 वर्षांनी तिसऱ्यांदा चॅम्पियन


कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या सतराव्या मोसमाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या इतिहासात कोलकात्याचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. कोलकात्यानं याआधी 2012 आणि 2014 साली आयपीएल जिंकण्याची कामगिरी बजावली होती. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलची किंग ठरली आहे.


संबंधित बातम्या


IPL Final : आयपीएलमध्ये तब्बल 10 वर्षांचा दुष्काळ संपवला, केकेआरच्या विजयाचे शिल्पकार कोण?