Dance Deewane 4 : 'डान्स दीवाने 4' (Dance Deewane 4) या कार्यक्रमाने सलग साडे तीन महिने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. आता या कार्यक्रमाचा दिमाखदार महाअंतिम सोहळा पार पडला आहे. गौरव-नितीन या कार्यक्रमाचे विजेते ठरले आहेत. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) या कार्यक्रमाचे परिक्षक होते. पाच जोड्यांना मागे टाकत गौरव शर्मा आणि नितिनने 'डान्स दीवाने 4'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 


गौरव-नितिनने जिंकला 'डान्स दीवाने'


'डान्स दीवाने' या कार्यक्रमाने साडे तीन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता या कार्यक्रमाला विजेता मिळाला आहे. कार्यक्रमाच्या टॉप 6 फायनलिस्ट जोड्यांमध्ये ट्रॉफीसाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. गौरव आणि नितिन या कार्यक्रमाचे विजेते होते. दोघांनी संपूर्ण सीझन गाजवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. दिल्लीत राहणारा गौरव 22 वर्षांचा आहे. तर बंगळुरूमध्ये राहणारा नितिन फक्त 19 वर्षांचा आहे. नितिन आणि गौरवने 'डान्स दीवाने'साठी वेगवेगळ्या ऑडिशन दिल्या होत्या. पण पुढे एकत्र परफॉर्म केलं आणि विजेते होऊनच कार्यक्रमातून बाहेर पडले.


गौरव आणि नितिन दोघेही वेगवेगळ्या डान्स फॉर्मवर माहीर आहेत. त्यामुळे नितिन आणि गौरव जेव्हा एकत्र आले तेव्हा दोघांनीही आपल्या परफॉर्मेंसने सर्वांना थक्क केलं. गौरव आणि नितिनला ट्रॉफीसह 20 लाख रुपये मिळाले आहेत. नितिन आणि गौरवला एकमेकांची भाषा समजत नसली तरी त्यांना नृत्याची भाषा मात्र चांगलीच समजते. दोघे पूर्ण सीझन एकमेकांसोबत मृत्याच्या माध्यमातून बोलत असे. 






गौरव आणि नितिनला आपल्या जिंकण्याचा खूपच आनंद झाला आहे. दोघांनी अर्धे-अर्धे पैसे वाटून घेतले आहेत. नितिन जिंकलेले पैसे आपल्या आई-वडिलांना देणार आहे. तर काही दान करणार आहे. दुसरीकडे गौरव मात्र आपल्या गर्लफ्रेंडसोबत बाहेर फिरायला जाणार आहे. तसेच वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडणार आहे. जमल्यास छोटी कार घेणार आहे". 


गौरव आणि नितिनसह युवराज आणि युवांश, चिराश्री आणि चैनवीर, श्रीरंग आणि वर्षा, दिव्यांश आणि हर्ष, काशवी आणि तरनजोत हे देखील या कार्यक्रमात महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचले होते. पण शेवटी गौरव आणि नितिन यांनी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.


संबंधित बातम्या


Madhuri Dixit : माधुरी दीक्षितसाठी लेकरांचा मेसेज, व्हिडिओ पाहून अश्रू अनावर; बहिण बोलतानाही भावना अनावर