एक्स्प्लोर
शाहरुख-आमीर 25 वर्षात पहिल्यांदाच एकत्र, एकाच सेल्फीत!

मुंबई: एकमेकांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या अभिनेता शाहरुख खान आणि आमीर खान यांनी एकत्र सेल्फी काढला आहे. एरव्ही दोघांमध्ये विस्तवही जात नाही. दोघे अभिनयासाठी फेमस आहेतच, पण दोघांमधील वाद टोकाचा आहे. मात्र या वादाला छेद देत शाहरुख आणि आमीरने सेल्फी काढला. दुबईतील एका बर्थडे पार्टीत दोघेही हजर होते. या पार्टीत असं काही घडलं, जे गेल्या 25 वर्षात घडलं नव्हतं. शाहरुखने आमीरसोबत सेल्फी काढून, तो ट्विटरवर शेअर केला. इतकंच नाही, तर शाहरुख म्हणतो, "आम्ही एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो, मात्र पहिल्यांदाच सोबत फोटो काढत आहोत. मजा आली" https://twitter.com/iamsrk/status/830139019640070145 पीव्हीआरचे मालक अजय बिजली यांच्या बर्थ डेनिमित्त दोघेही दुबईत हजर होते. यावेळी अजय बिजली यांच्यासोबत शाहरुख आणि आमीरचा फोटो दिग्दर्शक करण जोहरने ट्विट केला आहे. https://twitter.com/karanjohar/status/829989858525511681
आणखी वाचा























