Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या जवान (Jawan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. नुकतेच एका नेटकऱ्यानं जवान चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या सिंगल मॉमच्या कथेबाबक ट्वीट केलं. या ट्वीटला रिप्लाय देऊन शाहरुखनं जवान चित्रपटामधील नयनताराच्या स्क्रिन टाईमबाबत सांगितलं आहे.

Continues below advertisement


अॅटलीच्या 'जवान' चित्रपटामधील नर्मदा या भूमिकेचा स्क्रीन टाईम कट केला गेल्याने नयनतारा नाराज आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. अशातच शाहरुखनं एका ट्वीटच्या माध्यमातून नर्मदा या भूमिकेबाबत भाष्य केलं आहे.


एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "मला आझादचा सुजीसोबतचा बाँड खूप आवडला. सिंगल मॉमची कथा अतिशय बारकाईने दाखवण्यात होती. सर्व स्तरातील महिलांचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल धन्यवाद." नेटकऱ्याच्या या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला आहे.


शाहरुखचं ट्वीट


नेटकऱ्याच्या  ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "सिंगल मदर म्हणून नर्मदाची कथा अप्रतिम आहे, असे मलाही वाटले. दुर्दैवाने गोष्टीच्या गरजेमुळे तिला अधिक स्क्रीन टाईम मिळू शकला नाही. परंतु जो होता तो अद्भुत होता." शाहरुखच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या केमिस्ट्रीला मिळाली प्रेक्षकांची पसंती


जवान या चित्रपटामधील शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील चलेया या गाण्यामधील शाहरुख खान आणि नयनतारा  यांचा रोमाँटिक अंदाज देखील प्रेक्षकांना आवडला.


‘जवान’ चित्रपटाची स्टार कास्ट


‘जवान’ हा 7 सप्टेंबर रोजी चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा विजय सेतुपती, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक आणि आलिया कुरेशी रिद्धी डोगरा, सुनील ग्रोवर, मुकेश छाबरा, योगी बाबू आणि एजाज खान  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जवानमधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


संबंधित बातम्या:


Atlee Kumar : ज्याला रंगावरून लोकांनी हिणवलं... त्यानेच बॉक्स ऑफिस गाजवलं; जाणून घ्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटली कुमारबद्दल...