Shyamchi Aai: 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.या चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरु झाली आहे, ती 'श्यामची आई' चित्रपटातील गाण्यांची. शास्त्रीय संगीताचे उपासक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे (Mahesh Kale) यांनी साने गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..' ही प्रार्थना नव्या सुरात आणि चालीत गुंफुन आपल्यासमोर गाण्याच्या स्वरूपात आणली आहे.


या गाण्यासंदर्भात बोलताना महेश काळे म्हणाले, "माझं काम पाहिलं तर जगाला आनंद वाटण्याचं काम आहे. काही वेळेला गाणं गाऊन, काही वेळी त्याच्याबद्दल मत प्रदर्शन करून तर केंव्हा केंव्हा नुसतं ऐकून तर कधी संगीतबद्ध करून गाण्याची वेगवेगळी आयामं मी माझ्या कामातून समोर आणत असतो. या गाण्यासंदर्भात मला आकाश पेंढारकर यांचा फोन आला. मला ते म्हणाले,'तू गाणं गाशील का?', मी त्या गाण्याचे शब्द पाहिले आणि पहिल्या दोन ओळी ऐकून माझा गाणं गाण्याचा निर्णय पक्का झाला. 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे .'. कायम गायक म्हणून आपण तन्मयतेने तल्लीनतेने प्रेम वाटत असतो. पण त्याला जर सामाजिकभावनेची झालर मिळाली तर या सगळ्या कार्याला एक वेगळं स्थान प्राप्त होतं.किंबहुना मला असं वाटतं ज्या समाजाने मला प्रेम दिलंय त्या समाजाचं मी देणं लागतो. याचा विचार करताना या प्रार्थनेला चाल लावण्याचे भाग्य मिळणं ह्यातून समाजाची परतफेड करण्याची संधी मला मिळाली. हे गाणं नसूम प्रार्थना आहे, नव्हे एक संवेदना आहे. हे गाणं प्रत्येकाच्या मनात बसलं पाहिजे. गाण्याचे शब्द कायम लक्षात राहतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केलेयत".



चित्रपटाच्या निर्मात्यांनी महेश काळे ह्यांनी संगितबद्ध केलेली आणि गायलेली 'खरा तो एकाची धर्म' ही प्रार्थना जगभरातील सर्व शाळांसाठी खुल्ली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते  भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर , आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.


अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु झाली. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर,सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Shyamchi Aai Trailer: बालपणीच्या आठवणी, आईची शिकवण आणि स्वातंत्र्य लढा; ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत