Shah Rukh Khan Ask SRK : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. किंग खानचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. रिलीजच्या 15 दिवसांत भारतात या सिनेमाने 526 कोटींची कमाई केली आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. आता 'आस्क एसआरके' (Ask SRk) या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.


शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमातील गाणी, किंग खानचा लूक अशा अनेक गोष्टींचं कौतुक होत आहे. चाहते त्याचा लूक कॉपी करण्याचा प्रयक्न करत आहेत. आता त्याच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चाहता शाहरुख सारखा अॅक्शन करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत चाहत्याने लिहिलं आहे,"माझे मित्र यश, जलजला आणि प्रतीक यांनी 'जवान'चा हा सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा नक्कीच पाहा आणि प्रतिक्रिया द्या". व्हिडीओ शेअर करत किंग खानने लिहिलं आहे,"पुढच्यावेळी अॅक्शन सीन करताना माझी मदत करायला या".  






'मन्नत'मध्ये पाल फिरते का? 


'आस्क एसआरके' या सेशनदरम्यान शाहरुख खानच्या एका चाहत्याने प्रश्न विचारला की,"मन्नतमध्ये (Mannat) पाल (lizards) फिरते का?". याप्रश्नाचं उत्तर देत किंग खानने लिहिलं आहे,"पाल फिरताना मी पाहिलेली नाही...पण फुलपाखरांना मात्र पाहिलं आहे. ती खूप सुंदर आहेत. त्यांना फुलांवर पाहायला मुलांना आवडते". 






बाप बाप असतो : शाहरुख खान


शाहरुखला टॅग करत एका यूजरने विचारलं की,"जवान' हा सिनेमा अबरामने पाहिला आहे का? सिनेमा पाहिल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"बाप बाप असतो...नाही..नाही..मी गंमत करत आहे. अबरामला 'जवान' सिनेमातील अॅक्शन सीन आणि क्लायमॅक्स आवडला. 






शाहरुखचा आगामी 'डंकी' (Dunky) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाबद्दल प्रश्न विचारत एका चाहत्याने लिहिलं आहे की,"डंकी' या सिनेमात काय खास असणार आहे? यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"राजकुमार हिरानींचा सिनेमा आहे...आणखी काय हवं". शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी बाप्पाचं आगमन; फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला,"भरपूर मोदक खाण्यासाठी..."