मुंबई : 'मला जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला असला तरी जितेंद्रला जन्म हा व्ही.शांतारामांनी दिला', असं सुपरस्टार जितेंद्र यांनी 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) बोलताना सांगितलं.  बालपण, व्ही.शांताराम यांच्यासोबतचे दिवस अशा अनेक आठवणी जेष्ठ अभिनेते जितेंद्र (Jitendra) यांनी माझा कट्ट्यावर सांगितल्या. चाळीतल्या घरामधील बालपणचे ते दिवस कसे होते याचा देखील उलगडा जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर केला. पंजाबी कुटुंबात जरी जन्म झाला तरी मराठीशी जोडलेली जितेंद्र यांची नाळ अजूनही तशीच आहे, याची लख्ख जाणीव त्यांच्याशी गप्पा मारताना माझा कट्ट्यावर झाली. 


'जितेंद्रला जन्म व्ही.शांताराम यांनी दिला'


जितेंद्र यांची मराठीशी नाळ अजूनही तितकीच जोडली गेली आहे. त्यांचा जन्म जरी मराठी कुटुंबात झाला असला तरी बालपण मराठी कुटुंबियांसोबत गेलं. पण आज गिरगावसोडून 62 वर्ष होत आहेत. यावर बोलतांना जितेंद्र यांनी म्हटलं की, जे माझ्या आतमध्ये आहे ते कधीही जाणार नाही. मराठी माझ्या आतमध्ये आहे आणि ते कधीही संपणार नाही. यामध्ये सर्वात मोठा वाटा हा व्ही.शांताराम यांचा आहे. मला जन्म हा माझ्या आईवडिलांनी दिली पण जितेंद्रला जन्म हा व्ही,.शांताराम यांनी दिला आहे. 


कसा होता जितेंद्र यांचा चाळीतील गणेशोत्सव?


जितेंद्र यांनी त्यांच्या वयाची 19 वर्ष ही गिरगावातल्या चाळीमध्ये घालावली. त्यावेळीच्या अनेक आठवणी देखील जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर सांगितल्या. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, मी जरी गिरगावातून बाहेर पडलो असलो तरीही गिरगाव माझ्यातून अजूनही गेलेलं नाही. आम्ही आरतीच्या वेळी आधी खिडकीतून बघायचो कि नक्की काय प्रसाद आहे.जिथे चांगला प्रसाद असायचा तिथे आम्ही आरतीला जायचो. गणपतीत जी नाटकं बसवली जायची तेव्हा देखील आम्हाला कोणी घ्यायचं नाही. कारण त्यामध्येही खूप मोठे कलाकार काम करायचे. 


आताच्या मोठ्या घरांमध्ये चाळीचा आनंद नाही - जितेंद्र 


जितेंद्र यांनी त्यांच्या घराच्या आठवणींविषयी सांगितलं. गिरगावतलं चाळीतलं घर सोडल्यानंतर जितेंद्र हे त्यांच्या कुलाब्यातील घरामध्ये राहालयला गेले. चाळीतल्या घरातून कुलाब्यातील मोठ्या घरात गेलो. पण चाळीतला तो आनंद अजूनही सापडला नाही.  जितेंद्र यांच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या फिटनेसचं रहस्य देखील त्यांनी यावेळी माझा कट्ट्यावर उलगडलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की,  आईचा मी अत्यंत लाडका होतो. मी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचा बराच प्रयत्न केला. पण माझ्या आई - वडिलांनी तसं केलं नाही. माझ्या फिटनेसमध्ये माझ्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे.


तुम्ही कितीही मोठे व्हा तुम्ही कायम कुटुंबाचेच असता


मी कायम कामात असायचो. त्यामुळे मुलं कधी मोठी झाली हे मला कळालचं नाही. एक हेलनसोबत मी एक रोमँटीक सीन करात होतो. तेव्हा प्रीमिरला एकता आली होती आणि तीने तो सीन पाहून हेलनकडे रागाकडे बघितलं, ही किस्सा जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर सांगतिला. 


आणि मला वाटलं मी पुन्हा गिरगावात जाईन


मी माझ्या स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसमधून अनेक चित्रपट प्रदर्शित केले. पण 1982 रोजी मोठं नुकसान झालं. तेव्हा वाटलं की आता मी पुन्हा एकदा गिरगावात जाईन. ऑक्टोबरमध्ये हे नुकसान झालं आणि त्याच्या काही महिन्यांनंतर हिम्मतवाला आला. पुन्हा एकदा नव्याने प्रवास सुरु झाला. मला 82 साली अडीच कोटींचं नुकसान झालं. तेव्हा बरीच मेहनत घेतली. पण ती वेळसुद्धा निघून गेली, असं जितेंद्र यांनी म्हटलं. 


जितेंद्र यांचं पहिलं प्रेम


गिरगावातल्या चाळीमध्येच जितेंद्र यांना पहिलं प्रेम भेटलं. पण त्या प्रेमाला ते आजपर्यंत भेटले नाहीत. माझ्या समोरच्या बालकनीमध्ये ती असायची. पण तिला कधीही भेटलो नाही इतकचं काय तर बोललो देखील नाही. त्यामुळे ते प्रेम कायम खास राहिल, अशी आठवण जितेंद्र यांनी सांगितलं. जितेंद्र यांनी जितकी बॉलीवूडचं विश्व गाजवलं तितकचं त्यांनी साऊथ सिनेसृष्टीचं देखील विश्व गाजवलं. त्यांच्या हिम्मतवाला, मवाली, कैदी यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांनी साऊथमधून देखील ऑफर येण्यास सुरुवात झाली. 


जितेंद्र यांचं कसं होतं व्ही शांतराम यांच्यासोबत नातं? 


जितेंद्र यांनी यावेळी माझा कट्ट्यावर व्ही.शांताराम यांच्यासोबतच्या आठवणींचा उलगडा केला. त्यांच्या अभिनेत्याच्या प्रवासामध्ये व्ही.शांतराम यांचं काय श्रेय आहे हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.  'माझ्या वडिलांचं आर्टीफिशअल दागिन्यांचं दुकान होतं. त्यावेळी नवरंग चित्रपटासाठी दागिने घेऊन गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला गेटवर अडवलं. पण त्यानंतर माझ्या वडिलांनी चर्चा केली. त्यानंतर त्या सेटवर मला थेट प्रिन्सची भूमिका मिळाली. पण त्यावेळी कळालं की त्या भूमिकेसाठी 200 जणं आले होते. माझे काका त्यानंतर मला व्ही शांताराम यांच्याशी भेट घालून दिली. तेव्हा त्यांनी मला सेहरा चित्रपटामध्ये मी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली.' 


'बिकानेरमध्ये शूट चालू असताना व्ही.शांताराम, संध्याजी, मुमताज यांच्यापासून ते अगदी स्पॉटबॉयपर्यंत सगळे एकत्र जेवायला बसायचो. हा व्ही. शांताराम यांचा नियम होता. पण मला नेहमी उशीर व्हायचा. त्यावेळी मुमताज यांनी माझा तक्रार केली. त्यानंतर अण्णा माझ्यावर चिडले. त्यानंतर मी वडिलांना फोन केला आणि सगळं सांगितलं. तेव्हा वडिलांकडून मला बराच ओरडा पडला. या गोष्टीमुळे माझं आयुष्य बदललं. कारण जर वडिलांनी माझी बाजू घेतली असती तर आज मी जे काही आहे तो कधीच घडलं नाही. दुसऱ्या दिवशी मी मेकअपमॅनला गयावया करुन ज्युनिअर आर्टिस्टचा मेकअप करायला लावला आणि अण्णांसमोर गेलो. तेव्हा त्यांनी मला फटकारलं आणि चलं शूटींगला. या गोष्टीमुळे मी खऱ्या अर्थाने घडलो.' जितेंद्र यांनी त्यांच्या अनेक आठवणींना माझा कट्ट्यावर उजाळा दिला.