Shaakuntalam Box Office Collection Day 1: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभु  (Samantha Ruth Prabhu) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. समंथाच्या ‘शाकुंतलम' (Shaakuntalam) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. काल (14 एप्रिल) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. ‘शाकुंतलम' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता काही क्रिटिक्सनं या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.  पण या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटानं रिलीजनंतर पहिल्या दिवशी केलेल्या कमाईबद्दल...


 समंथा रुथ प्रभुची ‘शाकुंतलम' ही एक  पीरियड ड्रामा फिल्म आहे. या चित्रपटाची समंथाचे चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. एका रिपोर्टनुसार, समंथाच्या ‘शाकुंतलम' या चित्रपटानं पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट वीकेंडला चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.


‘शाकुंतलम'ची स्टार कास्ट



शाकुंतलम या चित्रपटात शकुंतला ही भूमिका समंथानं साकारली आहे. या चित्रपटात समंथासोबतच अदिति बालन, सचिन खेडेकर, प्रकाश राज, अल्लू अरहा, गौतमी मधू  आणि मोहन बाबू यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे कथानक  कालिदास  यांनी लिहिलेल्या शकुंतला या नाटकावर आधारित आहे. शाकुंतलम या चित्रपटाचे शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती जळपास 80 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती नीलिमा गुना आणि दिल राजू यांनी केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शक  गुनशेखर  हे आहेत. 






 


समंथाचा आगामी चित्रपट


समंथा ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. काही दिवसांपूर्वी तिचा  यशोदा (Yashoda) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील समंथाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. समंथाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. समंथाचा खुशी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात समंथासोबतच अभिनेता विजय देवरकोंडा देखील प्रमुख भूमिका साकाराणार आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज होणार आहे असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Samantha : सौंदर्यवती समंथाला जडलेला मायोसिटिस आजार काय आहे? काय आहेत त्याची लक्षणं?