Mandira Bedi Birthday Special: आज अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) 51 वा वाढदिवस आहे. मंदिरा ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. मंदिरानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात तिच्या करिअरबाबत आणि तिच्या संपत्तीबाबत...
मंदिराचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव वीरेंद्र सिंद बेदी आणि आईचे नाव गीता बेदी आहे. मंदिराचा जन्म जरी कोलकाता येथे झाला , तरी तिने शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. शाळा, कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मंदिराने मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला. मंदिरानं निवडलेल्या करिअरला तिच्या पालकांचा पाठिंबा मिळाला.
मंदिराला ऑडिशन दिल्यानंतर पहिला ब्रेक 1994 मध्ये डीडी नॅशनलच्या 'शांती' या मालिकेमधून मिळाला. 'शांती' मालिकेनंतर मंदिरानं अनेक मालिकांमध्ये काम केलं . 'औरत', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'इंडियन आयडॉल', 'फेम गुरुकुल', 'डील या नो डील' या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात देखील तिनं काम केलं. तसेच मंदिरा ही आयपीएल आणि वर्ल्ड कप यांसारख्या मॅचचे अँकरींग देखील करते. 2003मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमध्ये मंदिरानं पहिल्यांदा अँकरींग केलं.
मंदिरा बेदीची संपत्ती
मंदिरा बेदी ही कोट्यवधींची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 2.3 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 18 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती 50 लाख ते 1 कोटी रुपये मानधन घेते.
14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशलशी लग्न केले. लग्नाच्या 11 वर्षानंतर, त्यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले. मंदिरा-राज कौशल हे वीरचे पालक झाले. यानंतर मंदिराने जुलै 2020 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव तिने तारा ठेवले. 2021 मध्ये राज कौशल यांचे निधन झाले.
मंदिरा तिचे काम आणि फिटनेस यांच्यात संतुलन राखते. यामुळेच ती इतक्या वयातही तंदुरुस्त आहे. मंदिरा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. ती वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
इतर महत्वाच्या बातम्या:
Mandira Bedi: मंदिरा बेदीचं टीव्हीच्या दुनियेत पुनरागमन; 'या' मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार!