Harry Potter: हॅरी पॉटरचे (Harry Potter) चाहते जगभरात आहेत.  हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये जादू, प्रेम आणि मैत्रीची कथा दाखवण्यात आली होती.  या कथांनी सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकली. लोक जेव्हा या कथा पाहतात तेव्हा त्यात हरवून जातात. आजही हॅरी पॉटर या चित्रपटांची सीरिज लोक आवडीनं बघतात.  आता हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी एचबीओ मॅक्स (HBO Max) या ओटीटी प्लॅटफॉर्मनं दिली आहे. एचबीओ मॅक्सनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हॅरी पॉटरच्या टेलिव्हिजन सीरिजची माहिती दिली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून हॅरी पॉटरचे चाहते खूश झाले आहेत. 


एचबीओ मॅक्सच्या (HBO Max)  इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, 'तुमचे  Hogwarts  चे लेटर आले आहे.  मॅक्सने हॅरी पॉटरच्या पहिल्या स्क्रिप्टेड टेलिव्हिजन सीरिजची ऑर्डर दिली आहे, ही सीरिज आयकॉनिक पुस्तकांचं अॅडॉप्टेशन असणार आहे.'  या सीरिजमध्ये कोणते कलाकार काम करणार आहेत? या  सीरिजचं नाव काय असणार आहे?  याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या टेलिव्हिजन सीरिजमध्ये काही नवे कलाकार प्रेक्षकांना बघायला मिळतील असा अंदाज लावला जात आहे.






“ही नवी मॅक्स ओरिजिनल सीरिज, कित्येक वर्षांपासून चाहते वाचत असलेल्या पुस्तकांवर आधारलेली आहे,” असे  HBO आणि मॅक्स कंटेंटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केसी ब्लॉयज यांनी या नव्या टीव्ही सीरिजबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले. रिपोर्टनुसार, ही टीव्ही सीरिज  2025 किंवा 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जे. के. रोलिंग हे या टीव्ही सीरिजचे कार्यकारी निर्माते असतील, असंही म्हटलं जात आहे. HBO मॅक्सवर हॅरी पॉटरची सीरिज रिलीज होणार आहे.


अभिनेता डॅनियल रॅडक्लिफनं (Daniel Radcliffe)  हॅरी पॉटरमध्ये (Harry Potter) फिल्म सीरिज हॅरीची भूमिका साकारली. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. तो या टेलिव्हिजन सीरिज काम करणार आहे की नाही? याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन, हॅरी पॉटर अँड चेंबर ऑफ सिक्रेट्स, हॅरी पॉटर अँड प्रिसिअर ऑफ अझकाबन,  हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर,  हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स,  हॅरी पॉटर  अँड हाफ-ब्लड प्रिन्स, हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज: पार्ट 2 यांसारखे हॅरी पॉटरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: