एक्स्प्लोर

मराठी सिनेसृष्टीतील तारा निखळला, अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता विजय चव्हाण यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा दुपारी 12 वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. विजय चव्हाण यांचं बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. विजय चव्हाण यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली. पुढे अनेक चित्रपट आणि मालिकाही केल्या. विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होतं. गेले काही दिवस विजय चव्हाण हे आजारी होते. काही महिन्यांपूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आजारावर मात करत, ते घरी परतले होते. यावेळी मात्र विजय चव्हाण मृत्यूशी झुंज हरले. विजय चव्हाण यांचा जन्म मुंबईतील लालबागमध्ये झाला होता. भारतमाता चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या हाजी कासम चाळीत ते लहानाचे मोठे झाले. दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर विजय चव्हाणांनी रुपारेल कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला होता. विजय कदम, विजय चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून 'रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरु केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेंशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे 'टूरटूर' नाटक करत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना विजय चव्हाणांचं नाव सुचवलं. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील कारकीर्द कशात काय लफड्यात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खॊली नं. 5, झिलग्यांची खोली, जाऊ बाई हळू, टुरटूर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदरपंत यांसारखी अनेक नाटकं विजय चव्हाण यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. संबंधित बातमी : 'मोरुची मावशी' विजय चव्हाण यांची कारकीर्द सिनेमा क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी सिनेसृष्टीचा मोठा कालावधी विजय चव्हाण यांनी पाहिला, त्यातील बदल पाहिले आणि त्यात बहुमूल्य योगदानही दिले. जत्रा, छकुला, अशी असावी सासू, आली लहर केला कहर, घोळात घोळ यांसारख्य तिनशेहून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.

असे पाहुणे येती, माहेरची साडी, येऊ का घरात, रानफूल, लाइफ मेंबर यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.

सन्मान

महाराष्ट्र सरकारचा ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने यंदा अभिनेते विजय चव्हाण यांचा गौरव झाला होता. आजवर विविध संस्थांनी त्यांच्या अभिनयाचा गौरव केला आहे. ‘अशी असावी सासू'मधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2017 सालच्या ‘संस्कृती कलादर्पण’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते.

VIDEO (संग्रहित) : अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती 'व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला, त्यावेळी एबीपी माझाने त्यांची मुलाखत घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Shruti Marathe On Film Rejection: '...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
'...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
Singer Gulab Sidhus Firing: भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
Pooja Sawant and Siddhesh chavan: पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
Venice Film Festival 2026: व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार
व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Embed widget