एक्स्प्लोर
Advertisement
इफ्फीमध्ये 'एस दुर्गा' दाखवा, केरळ हायकोर्टाचा आदेश
सिनेमाची प्रमाणित कॉपी म्हणजेच सेन्सॉर बोर्डाने मंजूर केलेली कॉपी इफ्फीमध्ये दाखवायला हवी, असं हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
थिरुवनंतपुरम : केरळ उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झटका दिला आहे. गोव्यात सुरु असलेल्या 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) अर्थात इफ्फीमध्ये मल्याळी चित्रपट 'एस दुर्गा' दाखवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या बंदी घालून इफ्फीमधून हा चित्रपट वगळण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर चित्रपट दिग्दर्शक सनल कुमार शशिधरण यांनी सरकारविरोधात केरळ हायकोर्टात धाव घेतली होती.
इफ्फीच्या 13 सदस्यीय ज्युरीच्या शिफारशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने फेटाळल्या होत्या. तसंच गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनमा दाखवण्यास बंदी घातली होती. हा महोत्सव 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
सिनेमाची प्रमाणित कॉपी म्हणजेच सेन्सॉर बोर्डाने मंजूर केलेली कॉपी इफ्फीमध्ये दाखवायला हवी, असं हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित न केलेली कॉपी इफ्फीच्या ज्युरींना पाठवल्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपट पॅनोरमा सेक्शनमधून वगळला होता. सुरुवातीला या सिनेमाचं नाव 'सेक्सी दुर्गा' ठेवण्यात आलं होतं. पण सेन्सॉर बोर्डाने ते 'एस दुर्गा' केलं.
"मी अतिशय आनंदी आहे. हा चित्रपटाचा विजय आहे. एरव्ही मी विजय साजरा करत नाही. पण या प्रकरणात मी यापासून दूर राहू शकत नाही. हा सिनेमाचा विजय आहे. हा आपल्या लोकशाहीचा विजय आहे. ज्युरीमध्ये सामील प्रत्येकाचा विजय आहे, ज्यांनी बलिदान दिलं. चीअर्स इंडिया, अशी प्रतिक्रिया शशिधरन यांनी दिली आहे.
रोटरडॅम 2017 च्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला हिवोस टायगर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. अकराव्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्डमध्ये (एपीएसए) चित्रपट प्रदर्शिक करण्यासाठी या चित्रपटाचे निर्माते ब्रिस्बेनमध्ये आहेत.
दुसरीकडे रवी जाधव यांचा 'न्यूड' चित्रपटही इफ्फीमधून वगळण्यात आला आहे. सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे न पाठवता, अपूर्ण चित्रपट थेट ज्युरींकडे पाठवला, असा दावा मंत्रालयाने केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
सोलापूर
निवडणूक
Advertisement