Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad Wedding : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नुकताच गर्लफ्रेंड उत्कर्षा पवारसोबत (Utkarsha Pawar) लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर ऋतुराजचे लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल असून असून चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) एक खास पोस्ट शेअर करत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 


ऋतुराज आणि साजली संजीव रिलेशनमध्ये असून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. पण एका मुलाखतीमध्ये सायली म्हणाली होती की,"आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. लोक उगाच आम्हाला ट्रोल करत आहेत आणि उगाच अफवा पसरवत आहेत. या ट्रोलिंगचा दोघांनाही त्रास होत आहे. मी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तरी लोक ट्रोल करत आहेत". 






चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार प्लेअर मराठमोळा ऋतुराज आणि उत्कर्षा नुकतेच महाबळेश्वरमध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या शाही लग्नसोहळ्यातील फोटांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान सायली संजीवच्या पोस्टने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सायली संजीवने इंस्टा स्टोरीवर ऋतुराज आणि उत्कर्षाचा रोमॅंटिक फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं आहे,"तुमच्यासाठी खूप आनंद होत आहे... मनापासून अभिनंदन". सायलीसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी ऋतुराजल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 



ऋतुराज आणि सायलीच्या अफेअरच्या चर्चा (Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad Relation)


ऋतुराजने एका सामन्यात सात षटकार मारण्याच्या पराक्रम केला होता. त्याच्या या धमाकेदार खेळीनंतर नेटकऱ्यांनी सायली संजीवच्या फोटोवर कमेंट्स केल्या. मॅच बघितली का वहिनी, काय बॅटिंग केलीय आमच्या भावाने' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या होत्या. तसेच तिच्या एका फोटोवर ऋतुराजनेदेखील कमेंट केली होती. 


ऋतुराजने गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत (Utkarsha Pawar) लग्न करत सायली संजीव सोबतच्या अफेअरच्या चर्चांना आता पू्र्णविराम दिला आहे. ऋतुराजची पत्नी उत्कर्षादेखील क्रिकेटपटूच आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांचे मित्र होते. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


संबंधित बातम्या


Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू