Sayali Sanjeev And Ruturaj Gaikwad: अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि क्रिकेटपटू  ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)  यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. पण आता ऋतुराज हा उत्कर्षा नावाच्या एका तरुणीसोबत लग्नगाठ बांधणार आहे, असं म्हटलं जात आहे. काल आयपीएल 2023 (IPL-2023) चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स या टीमचा विजय झाला. ऋतुराज देखील या टीमचा भाग आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर ऋतुराजनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यामधील एका फोटोमध्ये महेंद्र सिंह धोनी, ऋतुराज आणि उत्कर्षा हे तिघे दिसत आहेत. या फोटोला सायलीनं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


ऋतुराजनं उत्कर्षा आणि एम.एस. धोनी यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील दोन VVIPs. यासाठी देवाचे आभार मानतो.' ऋतुराजच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. त्यानंतर या ऋतुराजनं शेअर केलेल्या या फोटोला सायलीनं कमेंट केली, 'दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन..' या कमेंटमध्ये सायलीनं उत्कर्षा आणि ऋतुराजला टॅग केलं आहे.


 सलील कुलकर्णी, गौतमी देशपांडे यांनी देखील ऋतुराजनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. 






एका मुलाखतीमध्ये सायलीला ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत विचारण्यात आलं होतं. यावेळी सायली म्हणाली होती, 'आम्ही फक्त मित्र आहोत. या ट्रोलिंगमुळे आमची मैत्री देखील राहिली नाही. ट्रोलिंगचा आम्हाला त्रास झाला आहे. मी काही दिवसांपूर्वी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केला.तो फोटो मी माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शेअर केला होता. त्या फोटोला लोकांनी ज्या कमेंट केला होत्या, त्या कमेंट वाचून मला भिती वाटू लागली. त्यामुळे मला असं वाटायला लागलंय मी पिवळ्या रंगाचे कपडे घालणं बंद केलं पाहिजे.'


सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीच्या 'झिम्मा' या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. गेल्या काही दिवसांपासून सायली ही तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sayali Sanjeev And Ruturaj Gaikwad:  ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेवर सायली म्हणाली, 'असं वाटलं पिवळ्या रंगाचे कपडे घालणं बंद केलं पाहिजे...'