एक्स्प्लोर

Sath Sobat : 'साथ सोबत' चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित; मोहन जोशी, संग्राम समेळ प्रमुख भूमिकेत

'साथ सोबत' हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Sath Sobat : 'साथ सोबत' (Sath Sobat) या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या 'साथ सोबत'च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 'साथ सोबत' या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही रमेश मोरे यांनीच केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहेत. 'साथ सोबत'च्या टिझरची आपली काही वैशिष्ट्ये आहेत. नायकाच्या मुखातील केवळ एक संवाद उत्सुकता वाढवणारा आहे. 'साथ सोबत'च्या रूपात तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट पहायला मिळणार असल्याची चाहूल टिझर पाहिल्यावर लागते. यातील नयनरम्य निसर्ग मन मोहून टाकणारा आहे. सुरेख कॅमेरावर्क, नयनरम्य लोकेशन्स आणि मातब्बर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट ठरणार असल्याचं टिझरवरूनच जाणवतं. या चित्रपटात गावाकडची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. भपकेबाजपणापासून दूर असलेली साधी भोळी लव्हस्टोरी हेच या चित्रपटाचं खरं सौंदर्यस्थळ ठरणार आहे. प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही चित्रपटात दडलेला आहे. मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला संग्राम समेळ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. त्यामुळे नव्या जोडीची अनोखी केमिस्ट्री 'साथ सोबत'मध्ये रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या गेलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या रमेश मोरेंच्या कल्पक दिग्दर्शनाचा स्पर्श या चित्रपटाला लाभला आहे.

पाहा टीझर: 

'साथ सोबत' या चित्रपटात संग्राम-मृणाल या जोडीच्या साथीला राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. सिनेमॅटोग्राफी हर्षल कंटक यांनी केली असून, अभिषेक म्हसकर यांनी संकलन केलं आहे. यशश्री मोरे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतरचना संगीतकार महेश नाईक यांनी स्वरबद्ध केल्या आहेत. महेश नाईक यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. यशश्री मोरे यांनी वेशभूषा करण्याचीही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी रंगभूषा केली आहे. मीनल घाग यांनी नृत्य दिग्दर्शनासोबत केशभूषाही केली असून, प्रकाश कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कौशिक मारू आणि यशश्री मोरे 'साथ सोबत' या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 18 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget