Alia Bhatt : सोशल मीडियावरील फोटोमुळे रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी चित्रपटासाठी तसेच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत. आतापर्यंत त्यांच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर आलिया आणि रणबीर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
प्रसिद्ध साडी डिझायनर बिना कन्ननने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आलिया आणि रणवीर खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये आलियाने पांढरा कुर्ता परिधान केला आहे, तर रणबीर निळ्या रंगाच्या शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे.
बिना कन्ननने शेअर केलेला फोटो समोर येताच रणबीर आणि आलियाने लग्नाच्या खरेदीची लगबग सुरू केली आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. काही युजर्सनी कमेंट करून विचारले आहे की, हे जोडपे लग्न करण्याच्या तयारीत आहे का? तर एका यूजरने विचारले की, लग्न कधी आहे?
दरम्यान, आलिया भट्टचा ट्रिपल आर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे चाहते खूपच कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या