Sanjay Leela Bhansali Movie Love And War: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकतात. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट देखील ठरली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेते विकी कौशल (Vicky Kaushal), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 


संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचं आगामी चित्रपटाचं नाव काय?


संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचं आगामी चित्रपटाचं नाव 'लव्ह अँड वॉर' असं आहे. नुकतीच आलिया आणि विकीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. आलियानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर 'संजय लीला भन्साळी यांचा इपिक सागा "लव्ह अँड वॉर" ख्रिसमस 2025 मध्ये येत आहेत. सी यू एट द मुव्हिज' असं लिहिलेलं दिसत आहे. आलियानं या फोटोला कॅप्शन दिलं, "एक चिरंतन सिनेमाचे स्वप्न साकार झाले आहे."






रणबीर आणि आलियानं याआधी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम केलं आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या सावरिया या चित्रपटातून रणबीरनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तसेच आलियानं संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलियानं मुख्य भूमिका साकारली आहे. आता रणबीर आणि आलिया आणि विकी हे 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत.


संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट


खामोशी, हम दिल दे चुके सनम, देवदास, बाजीराव मस्तानी आणि रामलीला या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या 'लव्ह अँड वॉर'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


National Film Awards 2023:  "मी संजय लीला भन्साळी यांचे आभार मानते"; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती आलिया भट्टनं व्यक्त केला आनंद