Sangharshayoddha: मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange)  लढत आहेत. मनोज जरांगे यांच्या जीवनात घडलेल्या घटना या आता 'संघर्षयोद्धा' (Sangharshayoddha) या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहेत. अशताच आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हा अभिनेता या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.


'संघर्षयोद्धा' चित्रपटात अरबाज शेख साकारणार भूमिका 


सैराट या चित्रपटातील सलीम शेख म्हणजेच सल्या ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख हा 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या चित्रपट महत्वाची भूमिका साकारणार आहे. अरबाज शेखनं संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "राज्यभर चर्चेत असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मी महत्वाची भूमिका बजावत असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्यभूमिका बजावत असणारे रोहन पाटीलयांच्या सोबतचा हा शूटलोकेशनचा फोटो" अरबाजनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






'संघर्षयोद्धा' चित्रपटात 'हे' कलाकार साकारणार भूमिका


गोवर्धन दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांनी  लिहिले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. 






कधी रिलीज होणार चित्रपट?


येत्या 26  एप्रिल 2024 रोजी 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे  यांनी केलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Manoj Jarange Movie : मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर; अंतरवाली सराटीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात