Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Sara Ali Khan : जय भोलेनाथ! अयोध्येतील राम मंदिरात न जाता सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला; नेटकऱ्यांनी घेतली शाळा


Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यानचे सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे सारा अली खानने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं (Grishneshwar Jyotirlinga) दर्शन घेतलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


OTT Release This Week : रणबीर कपूरचा 'Animal' ते विकी कौशलचा 'सॅम बहादुर'; 'या' आठवड्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी


OTT Release This Week : सिनेमागृहात धमाका केल्यानंतर ओटीटी विश्व (OTT) गाजवण्यासाठी बॉलिवूडपट सज्ज आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे आणि सीरिज नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, झी 5, हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. या सिनेमांची आणि सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) ते विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Shivrayancha Chhava : "या' सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार"; 'शिवरायांचा छावा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट


Shivrayancha Chhava : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा नवा टीझर आऊट झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. या टीझरमध्ये शिवराय शंभूबाळाला सिंहासनाचं महत्व सांगताना आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : पोपटलाल चढणार बोहल्यावर? 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये झाली 'या' अभिनेत्रीची एन्ट्री


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा कार्यक्रम गेली 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या शोमध्ये आता एका अभिनेत्रीनं एन्ट्री केली आहे. या अभिनेत्रीची आणि पोपटलालची लव्ह स्टोरी तारक मेहता या शोमध्ये दाखवण्यात आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Chak De India : 'चक दे इंडिया' गाणं कसं तयार झालं? मनाला भिडणाऱ्या गाण्याचा सलीम सुलेमान यांनी सांगितला किस्सा


Chak De India : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'चक दे इंडिया' (Chak De India) हा सिनेमा 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिमित अमीन (Shimit Amin) दिग्दर्शित हा सिनेमा सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवणाऱ्या या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा