The Bhootnii Teaser Out Now : गतसालात बॉलिवुडमध्ये भयपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या चित्रपटांनी बक्कल पैसा तर कमवलाच. सोबतच या चित्रपटाला लोकांचीही मोटी पसंती मिळाली. विशेष म्हणजे यातील काही भयटांचा पुढचा भागही यावा, अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. यामध्ये मुंज्या, शैताना, भूलभूलैया-3 अशा चित्रपटाचां समावेश आहे. दरम्यान, या वर्षीदेखील सिनेरसिकांना भयपटांची मोठी मेजवानी मिळणार असून यातील 'द भूतनी' या पहिला चित्रपटाचे टिझर लॉन्च झाले आहे.


चित्रपटाचा टिझर आला


गेल्या अनेक दिवसांपासून द भूतनी या चित्रपटाची चर्चा आहे. हा एक भयपट असून आत्मा, भूत-प्रेतांचा मानवाशी संघर्ष दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रेमकहाणीही असणार आहे. त्यामुळेच हा चित्रपट कधी येतोय, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. असे असतानाच आता या चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला आहे. हा टिझर पाहून चित्रपटही तेवढाच दमदार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  


टिझरमध्ये नेमके काय आहे? 


द भूतनी या चित्रपटाचे एक मनिट 11 सेकंदाचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. या टिझरमध्ये भूतनीचा मानवाशी संघर्ष दाखवण्यात आलाय. टिझरनुसार या भयपटातील मुख्य पात्र आपले प्रेम मिळवण्यासाटी भूतनीसोबत लढा देताना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दिग्गज अभिनेता संजय दत्तही दिसणार आहे. या टिझरमध्ये संजय दत्त भूतनीशी लढताना दिसतोय. 


चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत?


या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. यामध्ये संजय दत्त, मौनी रॉय, सन्नी सिंह, अभिनेत्री श्वेता तिवारीच मुलगी पलक तिवारी, आसीफ खान, बे योनिक तसेच इतरही कलाकार दिसणार आहेत. संजय दत्त आणि दीपक मुकूट हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धांत सचदेव यांनी पार पाडली आहे. चित्रपटात मौनी रॉय ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. 


18 एप्रिल रोजी होणार प्रदर्शित


दरम्यान, हा चित्रपट येत्या 18 एप्रिल रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी मुंज्या, भेडिया, भूलभूलैया-3 यासारख्या चित्रपटांना मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे या वर्षी द भूतनी या चित्रपटावरही लोक तेवढेच प्रेम करणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.


पाहा टिझर :



हेही वाचा :


मोठी बातमी! शाहरुख खान 'मन्नत' बंगला सोडणार, 24 लाख रेंट मोजून अपार्टमेंटमध्ये राहण्याची वेळ; कारण काय?


सौंदर्याची आणि अभिनयाची जादू पसरवणारी तमन्ना भाटियाचा जिम लूक; पाहा फोटो!


Hina Khan :ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवं फोटोशूट!