Govinda Sunita Ahuja Divorce Rumors: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) गोविंदा (Govinda) सध्या लाईमलाईटमध्ये आहे. पत्नी सुनीतासोबतच्या 37 वर्षांनंतरच्या सुखी संसारानंतर दोघेही काडीमोड घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा नसून जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. अशातच गोविंदाची पत्नी किंवा गोविंदा दोघांकडूनही याबाबत कोणीती स्पष्टता दिलेली नाही. अशातच गोविंदाच्या पत्नीचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांकडून हे व्हिडीओ घटस्फोटाच्या चर्चांसोबत जोडले जात आहेत. त्यासोबतच असं म्हटलं जात आहे की, फार पूर्वीच सुनीता अहुजानं घटस्फोटाची हिंट दिली होती. पण, त्यावेळी कोणाला काही समजलं नाही. दरम्यानस सुनीता अहुजाचा एक महिन्यापूर्वीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाचं एका 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू आहे. गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये यामुळेच मतभेद वाढले असून त्यांचं नातं आता तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं बोललं जात आहे. या गोष्टीत कितपत तथ्य आहे, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशातच आता सुनीता अहुजाचा एका मुलाखतीचा इंटरव्यू व्हायरल होत आहे. यावरुन सुनीतानं एक महिन्यापूर्वीच घटस्फोटाची हिंट दिल्याचं बोललं जात आहे.
सुनीता अहुजाच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय?
गेल्या एका महिन्यात गोविंदाच्या पत्नीचा अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यापैकी एक म्हणजे, Hauterrfly शी सुनीतानं साधलेला संवाद. यावेळी सुनीता तिची मुलगी टीनासोबत होती. जिथे ती तिच्या आयुष्यातील अनुभव शेअर करताना आणि लोकांना सल्ला देताना दिसली. खरंतर सुनीताला गोविंदाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना उत्तर देताना ती म्हणाली की, आम्हाला अजूनही असं वाटत नाही की, "आम्ही पती-पत्नी आहोत, मी त्याला म्हणत असते अरे, आजही मला विश्वास बसत नाही की, तो माझा नवरा आहे." पुढे बोलताना तिनं हात जोडून लोकांना आवाहनही केलं.
ती म्हणाली की, "आयुष्यात, तुमच्या बॉयफ्रेंड आणि नवऱ्याला कधीही म्हणू नका की, तू काहीच करत नाहीस. जर तो करायला गेला तर, तो असं काही करेल की, त्यातून बाहेर पडायला दोन वर्ष लागतील, पण तो बाहेर येता येणार नाही. तुम्ही आयुष्यातून निघून जाल, पण ती आयटम जाता जाणार नाही. या काही टिप्स आहे, ज्या मी तुम्हाला देत आहे."
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न 1987 मध्ये झाले. दोघेही एकमेकांना बालपणापासून ओळखत होते. सुरुवातीला दोघांना एकमेकांशी बोलायलाही अजिबात आवडत नव्हतं आणि दोघेही खूप भांडायचे. पण पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर दोघांनीही डेटिंग सुरू केली. सुनीताचे वडील या लग्नाच्या विरोधात असले तरी वडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनीही लग्न केलं. अशातच आता 37 वर्षांच्या सुखी सुंसारानंतर दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :