Boney Kapoor On Salman Khan : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे नसल्याचे म्हटले जाते. माध्यमांसह, चाहत्यांमध्येदेखील ही चर्चा रंगत असते. मात्र, निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी आपल्या मुलाला अभिनेता करण्याचे श्रेय सलमान खानला दिले आहे. सलमान आणि अर्जुन यांच्यात आता फारसे चांगले संबंध नाही याची कबुली बोनी कपूर यांनी दिली. अर्जुनमुळे सलमानसोबतचे संबंध बिघडले का, यावरही बोनी कपूर यांनी भाष्य केले.
सलमानमुळे अर्जुन अभिनेता झाला
अर्जुन कपूर अभिनेता होऊ शकेल असे वडील बोनी कपूर यांनादेखील वाटले नव्हते. 'न्यूज 18' ला दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले की, अर्जुनचा प्रश्न आहे, जरी मी मोनापासून वेगळे झालो असलो तरी अर्जुनला अभिनेता व्हायचे आहे असे माझ्या मनात कधीच नव्हते. तेव्हा सलमानने मला फोन केला आणि तो अभिनेता होणार असल्याचे सांगितले.
संबंध पूर्वीसारखे चांगले राहिले नाहीत
बोनी यांनी सांगितले की, सलमानने अर्जुनची जबाबदारी घेतली आणि त्याचे वजन कमी केले. अर्जुनच्या बाबतीत मी सलमानला श्रेय देतो. आता त्यांच्यातील संबंध चांगले पूर्वीसारखे चांगले राहिले नाहीत, अशीही कबुलीही त्यांनी दिली. पण सलमानने अर्जुनवर मेहनत घेतली. अर्जुनची भूमिका, फिटनेसबद्दलची सजगता यावर सलमान समाधानी असल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले.
सलमानसारखे लोक कमी आहेत
बोनी यांना विचारण्यात आले की अर्जुनसोबतच्या मतभेदानंतर तिच्या सलमानसोबतच्या नात्यावरही परिणाम झाला आहे का? बोनी यांनी सांगितले की त्यांच्या नात्यात कोणताही बदल झाला नाही. बोनी यांनी सांगितले की, मी अजूनही त्याच्यावर प्रेम करतो. त्याच्यासारखे फार कमी लोक आहेत. मोठ्या मनाचा असून माझा खूप आदर करतो आणि मी त्याच्यावर प्रेम करतो असेही बोनी कपूर यांनी सांगितले.