Rashmika Mandanna : दाक्षिणात्य मनोरंनजसृष्टी गाजवल्यानंतर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडदेखील गाजवत आहे. अभिनेत्रीने बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉक्स ऑफिसवर तिच्या सिनेमांनी धुमाकूळ घातला आहे. रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. साऊथसह बॉलिवूडमध्येही तिने आपला दबदबा निर्माण केला आहे. 'अॅनिमल' (Animal) सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्रीला नॉर्थ इंडियामध्येही चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. रश्मिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. वैयक्तिक आयुष्यासंबंधित अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिच्या मॉर्निंग फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रश्मिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'या' कारणाने रश्मिकाची सकाळ होते खास


रश्मिका मंदानाची दररोजची सकाळ घरातील एका सदस्यामुळे खास होत असते. रश्मिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रश्मिकासोबत तिने पाळलेला श्वान दिसून येत आहे. फोटोत अभिनेत्रीचा फक्त अर्धा चेहरा दिसून येत आहे. तर तिने श्वानला कड्यावर घेतलं आहे. श्वानसोबतचा फोटो शेअर करत रश्मिका मंदानाने लिहिलं आहे,"माझी दररोजची सकाळ याच्यामुळे खास होत असते". रश्मिकाने पाळलेल्या श्वानचं नाव ऑरा असं आहे. रविवारी तिने ऑराच्या पायांच्या ठशांचा फोटो शेअर करत लिहिलं होतं,"मला तुझी खूप आठवण येतेय".



 


रश्मिका मंदानाच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या (Rashmika Mandanna Upcoming Movies)


रश्मिका मंदानाच्या 'द गर्लफ्रेंड'चा टीझर 5 एप्रिल 2024 रोजी अभिनेत्रीच्या वाढदिवशी रिलीज करण्यात येणार आहे. अभिनेत्रीने पाच भाषांमध्ये हा सिनेमा डब केला आहे. हा टीझर खूपच खास असणार आहे. तसेच 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा अॅक्शन ड्रामा सिनेमातही रश्मिका अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) झळकणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. सुकुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फहद फासिलदेखील या सिनेमात दिसणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा पॅन इंडिया चित्रपट रिलीज होणार आहे. रश्मिकाचा 'अॅनिमल' हा चित्रपट शेवटचा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अभिनेत्री रणबीर कपूरसोबत झळकली होती. रश्मिका सध्या 'पुष्पा 2' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. लवकरच या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू होईल. रश्मिका मंदानाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Rashmika Mandanna : मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावली 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या