Samantha Ruth Prabhu : समंथाची सोशल मीडिया पोस्ट, चाहते म्हणाले....
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोवरून एका चाहत्याने तिला थेट लग्नाबद्दल प्रश्न विचारला आहे. Samantha Ruth Prabhu : चाहत्याचा समंथाला भन्नाट प्रश्न, म्हणाला...
Samantha Ruth Prabhu : साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आधी घटस्फोट आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ती आजारपणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे ती सिनेसृष्टीपासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु, समंथा आजारातून बरी झाली आहे. नुकताच तिने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
समंथाला 'मायोसिटिस' हा आजार झाल्याची माहिती तिने स्वत:च दिली होती. त्यानंतर आता ती या आजारातून बरी झाली आहे. आजारातून बरी होताच समंथाने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केलाय. या फोटोला तिने एक हटके कॅप्शन देखील दिले आहे. 'प्रकाशाच्या शोधात.' असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे.
समंथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तीने टी शर्टसोबत पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. या फोटोमध्ये तीने स्मित हास्य केल्याने ती खूपच सुंदर दिसत आहे. समंथाने हा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. '2023 ला सगळीकडे आनंदाचे वातावरण राहणार आहे' अशी कमेंट्स एका चाहत्याने केली आहे. तर एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, 'सूर्य चंद्राचे चुंबन घेत आहे. तर एका यूजर्सने लिहिले आहे की, 'तुला प्रकाशाची गरज नाही. तू एक चमकता तारा आहे.' याशिवाय समंथाच्या एका चाहत्याने म्हटलं आहे की, 'तुझा सोबत लग्न करायचे असेल तर तुझ्या अटी काय आहेत? अशा अनेक कमेंट्स समंथाच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
समंथा लवकरच येणार प्रेषकांच्या भेटीला
दरम्यान, समंथा लवकरच प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 17 फेब्रुवारी रोजी समंथाचा 'शांकुतलम' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'अभिज्ञानम' या सांस्कृतिक नाटकावरुन 'शाकुंतलम' या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. 'सिटाडेल' या इंडियन रिमेक 'चित्रपटात' समंथा बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सोबत दिसणार आहे.
काय आहे मायोसिटिस आजार?
समंथाला झालेला मायोसिटिस हा एक दुर्मिळ आजार आहे. मायोसिटीस या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी स्नायूंवर हल्ला करते. ज्यामुळे वेदना आणि जळजळ होते. सुरुवातीच्या टप्प्यात ही स्थिती असलेल्या व्यक्तीला चालणे, बसणे किंवा झोपण्याच्या स्थितीत बदल करणे कठीण होऊ शकते. समंथा या आजारातून आता बाहेर पडली आहे.