Sam Bahadur: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur)  हा मोस्ट अवेटेड चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक जण या चित्रपटामधील विकीच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ‘सॅम बहादूर’  या चित्रपटात विकीनं सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे.  आता  ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  यांनी  या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे.


आनंद महिंद्रा यांनी शेअर केलं ट्वीट


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट शेअर करुन ‘सॅम बहादूर’  या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "जेव्हा एखादा देश त्यांच्या नायकांच्या कथा सांगणारे चित्रपट तयार करतो, तेव्हा एक शक्तिशाली सद्गुण चक्र तयार होते. विशेषत: सैनिक, नेतृत्व आणि धैर्याच्या कथांबद्दल लोकांना अभिमान वाटतो आणि  त्यांचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा लोकांना माहित होते की, त्यांच्या धैर्याचा गौरव केला जाईल तेव्हा आणखी नायक उदयास येतील. हॉलिवूडने शतकानुशतके हे पुण्यचक्र निर्माण केले आहे. त्यामुळे धन्यवाद रॉनी स्क्रूवाला आमच्यासाठी असे चित्रपट बनवल्याबद्दल. विकी कौशल हा सॅम बहादुर यांच्या भूमिकेत पूर्णपणे रूपांतरित  झाला. ते पहा आणि एका अस्सल भारतीय नायकाचा जयजयकार करा." 




काय म्हणाला सचिन तेंडुलकर?


सचिननं ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. चित्रपट पाहिल्यानंतर सचिन म्हणाला, "हा खूप चांगला चित्रपट आहे. विकीच्या अभिनयाने मी प्रभावित झालो आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ खरोखरच आपल्यासमोर आहेत, असे वाटले.आपल्या देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा असे मी म्हणेन. मी म्हणेन की हा चित्रपट सर्व पिढ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे."




'सॅम बहादुर' या चित्रपटात विकी कौशलसोबतच फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, गोविंद नामदेव, मोहम्मद जीशान यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 


संंबंधित बातम्या:


Sam Bahadur Box Office Collection : रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सॅम बहादुर'च्या कमाईत वाढ; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन