Ranbir Kapoor And Tripti Dimri: अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor)  'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अभिनेत्री  रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. पण सध्या रश्मिका नाही तर अॅनिमल चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारलेल्या  तृप्ती डिमरीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सध्या रणबीर आणि तृप्तीचा अॅनिमल चित्रपटामधील इंटिमेट सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील रणबीर आणि तृप्तीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीनच्या व्हिडीओमधील रणबीर आणि तृप्तीच्या केमिस्ट्रीचं अनेकजण कौतुक करत आहेत. या सीनमध्ये रणबीर आणि तृप्ती हे सेमी न्यूड दिसत आहेत. 


नेटकऱ्यांनी केलं तृप्ती डिमरीचं कौतुक


अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर तृप्ती डिमरीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,  "रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या केमिस्ट्रीने धुमाकूळ घातला!  त्या दोघांचे सीन्स अगदी जादूई होते." तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं,  "तृप्ती डिमरी ही मुख्य अभिनेत्री असायला हवी होती,  तिचे उच्चार रश्मिकापेक्षा स्पष्ट आहेत."










काही नेटकऱ्यांनी असा दावाही केला की तृप्ती डिमरी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये महत्त्वाची भूमिकेत असू शकते. एका यूजरने ट्वीटमध्ये लिहिले - 'अ‍ॅनिमल' पार्क तृप्ती दिमरीभोवती फिरेल, "मला वाटते की, ती मुख्य पात्रांपैकी एक असेल, 'अ‍ॅनिमल' चित्रपचात तिची भूमिका छोटी होती, पण ती एक विशेष भूमिका होती, जी मला वाटते भाग 2 मध्ये आणखी दाखवली जाईल!"






 'अॅनिमल' या चित्रपटाचं दिग्दर्शन धुरा संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga)  यांनी केलं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी दिवशी 'अॅनिमल' चित्रपटानं 63.8 कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 66 कोटींची कमाई केली आहे. 


संबंधित बातम्या:


Bobby Deol: पापाराझीसमोर ढसाढसा रडला बॉबी देओल; म्हणाला, "मी स्वप्न पाहतोय, असं वाटतंय"