Urfi Javed Instagram Suspended : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत नाही असा एकही दिवस जात नाही. अभिनेत्री अनेकदा हटके आणि अतरंगी फॅशन स्टाईलमुळे किंवा बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं आहे. पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.


अभिनेत्री उर्फी जावेदचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं आहे. अभिनेत्रीने स्वत: स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीचं इंस्टाग्राम सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम सस्पेंड झाल्याने उर्फीचे चाहते हैराण झाले आहेत. 


उर्फी जावेदने शेअर केला स्क्रीनशॉट (Urfi Javed Shared Suspended Screenshot)


उर्फीने सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. उर्फीने आता तिचं अकाऊंट रिकवर केलं आहे. तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर मेटाने दिलेली माहिती दिसत आहे. कम्यूनिटी गाइडलाइन्सचं पालन न केल्याने इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाल्याचं यात म्हटलं आहे. तर उर्फीने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे,"आज अनेकांची इच्छा पूर्ण झाली".



उर्फी जावेद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर


उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फीची अतरंगी फॅशन काही चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तर अनेकदा यामुळे मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल केलं जातं. उर्फीला अनेकदा गंभीर धमक्या मिळाल्या आहेत. जीवे मारण्याच्या धमकीपासून ते रेपपर्यंतच्या धमक्या तिला मिळाल्या आहेत. ट्रोलर्सकडे उर्फी दुर्लक्ष करत आपल्या कामावर फोकस करत असते.


उर्फीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव 


उर्फी जावेदच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिलं आहे,"ही गंभीर बाब आहे". एका क्रिएटरसाठी सोशल मीडिया अकाऊंट खूप महत्त्वाचं असतं. या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. खूप चांगला निर्णय, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात". तर काहींनी मात्र 'मिस यू उर्फी' अशा कमेंट्स केल्या आहेत.


उर्फी जावेद कोण आहे? (Who is Urfi Javed)


उर्फी जावेद हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उर्फी आता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असली तरी छोटा पडदा मात्र तिने चांगलाच गाजवला आहे. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीझन 2, कसौटी जिंदगी की अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) या कार्यक्रमाचं पहिलं पर्वदेखील तिने गाजवलं आहे. तसेच MTV Splitsvilla मध्येही ती सहभागी झाली होती. अभिनेत्री असण्यासोबत ती एक उत्तम मॉडेल आहे. अनेक जाहिरातींमध्ये तिने काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


Urfi Javed : फाटके-तुटके कपडे घालणाऱ्या उर्फीने सर्व मर्यादा ओलांडली, टॉपलेस फोटो शेअर