एक्स्प्लोर
Advertisement
ट्युबलाईटच्या वितरकांना सलमानकडून 55 कोटींची भरपाई
मुंबई : सलमान खानने ईदच्या मुहूर्तावर थाटामाटत 'ट्युबलाईट' रिलीज केला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे सलमानने वितरकांचं झालेलं नुकसान भरुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
सलमानच्या 'ट्युबलाईट'चा बॉक्स ऑफिसवर प्रकाश पडू शकला नाही. त्यामुळे सिनेमाचे निर्माते आणि वितरकांनी सलमानकडे रिफंड मागितला. अखेर वितरकांनी मागितलेला परतावा देण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. ट्युबलाईटमुळे झालेलं डिस्ट्रीब्युटर आणि प्रोड्युसर्सचं नुकसान सलमान सहन करणार आहे.
चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट कोमल नाहता यांनी ट्विटरवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार सलमान वितरकांना 55 कोटी रुपये देणार आहे. ट्युबलाईट चित्रपटाने भारतात आतापर्यंत 114.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'ट्यूबलाईट'ने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 21.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शनिवारी सिनेमाची कमाई 21.17 कोटी होती. तर रविवारी सिनेमाला जवळपास 22 कोटी कोटी कमावता आले. त्यामुळे सलमानच्या ट्यूबलाईटने पहिल्या तीन दिवसात सुमारे 64 कोटी कमावले.
संबंधित बातम्या
बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...
'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?
एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्यूबलाईटचा उजेड
सिनेमेनिया : भाईजानचा 'ट्यूबलाईट' नक्कीच लख्ख प्रकाशणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भविष्य
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement