एक्स्प्लोर
सलमान खानमुळे मलायका अरोरा 'दबंग 3'मधून बाहेर
खरंतर मलायका अरोराला चित्रपटातून काढणं ही तशी आश्चर्यकारक बाब नाही.

मुंबई : सलमान खानच्या 'दबंग' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यानंतर त्याच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता दबंग सीरिजमधला तिसरा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटातही आयटम सॉन्ग असेल. पण त्यात मुन्नी अर्थात मलायका अरोरा दिसणार नाही. निर्माते अरबाज खान आणि सलमान खान यांनीच चित्रपटातील आयटम सॉन्गमधून मलायका अरोराचं नाव हटवलं आहे. तिच्याऐवजी आता करीना कपूर हे आयटम सॉन्ग करणार आहे. दबंगच्या सिक्वेलमध्ये 'फेव्हिकॉल से' या आयटम सॉन्गमध्ये करीना दिसली होती. त्यामुळे अरबाज आणि सलमानने या दबंग 3 मध्ये करीनाचीच निवड केली आहे. खरंतर मलायका अरोराला चित्रपटातून काढणं ही तशी आश्चर्यकारक बाब नाही. कारण अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराचं अर्जुन कपूरसोबत सूत जुळले. यानंतर सलमान आणि अर्जुनच्या नात्यातही कटुता आली आहे. एवढंच काय तर सलमानने अर्जुनला आपल्या घराचे दारही बंद केले आहे. शिवाय त्याच्यासमोबत काम करण्यासही नकार दिला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















