Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानने (Salman Khan) काल (8 ऑक्टोबर) एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. कारण सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली. सलमाननं शेअर केलेल्या फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. सलमान लग्न करणार आहे का? अशी चर्चा देखील सोशल मीडियावर होऊ लागली. आता सलमाननं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन मिस्ट्री गर्लचा चेहरा रिव्हिल केला आहे.
सलमाननं काल (8 ऑक्टोबर) सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये एका मुलीनं सलमानच्या खांद्यावर डोके ठेवलेले दिसले. फोटोमध्ये त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. सलमनानं त्या फोटोला कॅप्शन दिलं, 'मी नेहमी तुझ्यासोबत उभा राहीन...' सलमाननं शेअर केलेल्या फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. ही मिस्ट्री गर्ल सलमानची भाची अलिझेह अग्निहोत्री आहे.
सलमाननं नुकतेच अलिझेह अग्निहोत्रीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला सलमाननं कॅप्शन दिलं, "जीन में है प्यार और केअर... हम सिर्फ हम हैं।" सलमान आणि अलिझेह यांनी एका क्लोदिंग ब्रँडसाठी हे फोटोशूट केले होते.
अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा फर्रे हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.अलिझेह ही सलमानची बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेह ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. अलिझेह ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सलमानचे आगामी चित्रपट
सलमान खान हा'टायगर 3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट यावर्षी 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: