Seema Haider Sachin Love Story Shooting in Delhi : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय सचिनच्या (Sachin) प्रेमाची ताकद सर्वांनाच माहिती आहे. या जोडप्याच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कराची टू नोएडा' (Karachi to Noida) असे या सिनेमाचे नाव आहे. आता दिल्लीत (Delhi) या सिनेमाचं शूटिंग होणार असल्याचं समोर आलं आहे. 


दिल्लीत होणार 'कराची टू नोएडा'चं शूटिंग


सीमा हैदर आणि सचिन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'कराची टू नोएडा' या सिनेमाचं शूटिंग 10 आणि 11 ऑक्टोबरला दिल्लीत होणार आहे. नरेला कुंडली, पानीपत आणि दिल्लीतील नोएडा या परिसरात या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 


'कराची टू नोएडा' या सिनेमातील तब्बल 30 सीन्सचं शूटिंग दिल्लीत होणार आहे. आज (10 ऑक्टोबर 2023) या सिनेमाची स्टारकास्ट शूटिंगसाठी दिल्लीला रवाना होणार आहे. सीमा-सचिनच्या या सिनेमात 'गदर 2'मधील अभिनेता रोहित चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'गदर 2'मध्ये रोहितने मेजर मलिकची भूमिका साकारली होती. 


'कराची टू नोएडा' या सिनेमात कराची पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेता अहसान खान दिसणार आहे.'बजरंगी भाईजान' या सिनेमात पाकिस्तान पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसलेला मनोज बख्शी 'कराची टू नोएडा' या सिनेमात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. 


ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल...


'कराची टू नोएडा' या सिनेमात सीमा हैदरच्या भूमिकेत फरहीन खान आणि सचिनच्या भूमिकेत आदित्य राघव झळकणार आहेत. याआधी प्रोडक्शन टीमने ऑडिशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक मुलगी सचिनसोबत फोनवर बोलताना दिसत होती. मीडिया रिपोर्टनुसार, देशातील अनेक टॉपच्या अभिनेत्री आणि मॉडेल यांनी सीमा हैदरच्या भूमिकेसाठी ऑडीशन दिली आहे.  






सीमा हैदर गाजवणार रुपेरी पडदा


सीमा हैदरच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसरीकडे मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सीमा सज्ज आहे. 'A Tailor Murder Story' या सिनेमाच्या माध्यमातून सीमा हैदर अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवत आहे. उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैया लालच्या हत्येवर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात सीमा एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.


संबंधित बातम्या


Seema Haider: सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ चं पोस्टर रिलीज; 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका