Tejaswini Pandit: टोल दरवाढीवरुन (Toll Agigation) मनसे (MNS) पक्ष आक्रमक झाल आहे. या मुद्द्यावर आता मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः मैदानात उतरले आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या (Tejaswini Pandit) ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तेजस्विनीनं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. "आम्ही जो टोल भरत आहोत तो कुणाच्या खिशात जातोय?" असा प्रश्न तेजस्विनीनं हा व्हिडीओ शेअर करुन विचारला आहे.
तेजस्विनी पंडितचे ट्वीट
तेजस्विनीनं देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे टोलच्या मुद्द्याबाबत बोलत आहेत. ते म्हणतात, “शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही छोट्या गाड्यांना टोल मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रात आपण केवळ कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो.” तेजस्विनीनं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
तेजस्विनीनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "म्हणजे? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! हे "माननीय उपमुख्यमंत्री" यांचे विधान कसे असू शकते? अविश्वसनीय! तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा!" तेजस्विनीच्या या ट्वीटनं सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे.
टोलदरवाढीच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, टोलनाके बंद केले नाहीतर टोलनाके जाळून टाकू असा गंभीर इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.
"टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू" असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
MNS chief Raj Thackeray: राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, फडणवीस-अजित पवारांचे व्हिडीओ दाखवले