Salman Khan :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने (Salman Khan) INS विशाखापट्टणमध्ये जाऊन भारतीय नौदलाच्या जवानांची भेट घेतली आहे. सैनिकांसोबतचे सलमानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सलमाननं सैनिकांसोबत संवाद साधला. तसेच त्यांनं INS विशाखापट्टणम ही युद्धनौका पाहिली. तसेच त्यानं यावेळी सैनिकांसोबत पुशअप्स मारले, कूकिंग केलं आणि वर्कआऊट देखील केला. सलमाननं  INS विशाखापट्टणमवर तिरंगा फडकवला. उपस्थित सैनिकांनी सलमानचा ऑटोग्राफ देखील घेतला. सैनिकांची देशभक्ती आणि धैर्य पाहून सलमान भारावून गेला.


पाहा फोटो: 




आयएनएस विशाखापट्टनम माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. आयएनएस विशाखापट्टनम 163 मीटर लांब आणि 7400 टन वजनाची आहे. यामध्ये सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची 76 एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. आता भारतीय नौदलात 130 युद्ध नौका आहेत. विशाखापट्टणम या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर249 ए स्टीलचा वापर  करून केली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे. 




सलमानचे आगामी चित्रपट


लवकरच सलमानचे काही आगामी चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'कभी ईद कभी दिवाली', 'टायगर-3' या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच सलमान बिग बॉसच्या नव्या सिझनचं सूत्रसंचालन देखील करणार आहे. सलमानहा रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी रितेशनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. सलमानच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: