15 Years Of Chak De India : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) करिअरमधील 'बेस्ट' चित्रपटांपैकी एक असणारा चित्रपट हा 'चक दे इंडिया' (Chak De India)  आहे. 10 ऑगस्ट 2007 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला रिलीज होऊन आज 15 वर्षे झाली. चित्रपटाचे कथानक, डायलॉग, कलाकारांचा अभिनय या गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आजही हा चित्रपट लोक आवडीनं बघतात. या चित्रपटामधील हॉकी टीमच्या कोचची भूमिका शाहरुखनं साकारली. या भूमिकेचं नाव कबीर खान आहे. या भूमिकेसाठी शाहरुखला सात फिल्मफेयर मिळाले. कबीर खान ही भूमिका शाहरुखनं खूप चांगल्या पद्धतीनं साकारली आहे, असं अनेकांचे मत आहे. पण या भूमिकेच्या ऑफरला दोन अभिनेत्यांनी नकार दिला होता. 


'चक दे इंडिया'  या चित्रपटाचं दिग्दर्शन शिमित अमीन यांनी केले होते. कथा आणि पटकथा जयदीप साहनी यांनी लिहिली होती. या चित्रपटामधील कबीर खान या भूमिकेची ऑफर सर्वात आधी जॉन अब्राहमला देण्यात आली होती. त्यावेळी जॉननं या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. जॉननं या चित्रपटाच्या निर्मात्यांना शाहरुखचं नाव सुचवलं होतं. त्यावेळी शाहरुख हा 'कभी अलविदा न कहना' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी होता. पण हॉकी हा खेळ शाहरुखचा आवडता खेळ आहे. त्यामुळे त्यानं चित्रपटात काम करण्यास होकार दिला.


सलमानला देखील देण्यात आली होती ऑफर 
सलमान खानला देखील 'चक दे इंडिया'  या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. या चित्रपटामध्ये काम करण्यास सलमाननं होकार देखील दिला होता पण नंतर काही कारणांमुळे सलमाननं ही भूमिका साकारली नाही. 


चित्रपटाला मिळाली प्रेक्षकांची पसंती 



रिपोर्टनुसार, 'चक दे इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच हॉकी स्टिकच्या विक्रीत 30% वाढ झाली होती. चक दे ​​इंडिया हा 2007 चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. चित्रपटातील सागरिका घाटगे, चित्राश्री रावत, शिल्पा शुक्ला ,तान्या अबरोल, शुभी मेहता,विद्या माळवदे,सीमा आझमी, मॅसोचॉन,अनाहिता नायर ,आर्या मेनन,सॅंडिया फुर्टाडो या गर्ल गँगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 



वाचा इतर बातम्या: