एक्स्प्लोर

Salman Khan House Firing Case : भाईजानच्या घराजवळ गोळीबार, कॅनडात शिजला कट!तपासात आणखी काय समोर आलं?

Salman Khan House Firing Case :  सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात आता मोठ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

Salman Khan House Firing Case :  बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर रविवारी, पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान आपल्या कुटुंबीयांसह राहतो. सलमान खानला इशारा देण्यासाठी हा गोळीबार करण्यात  आल्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात आता मोठ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.  दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना करण्यात आले आहेत. 

फेसबुक पेजवर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या  आयपी ॲड्रेस कॅनडाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने एका कथित फेसबुक ऑनलाइन पोस्टमध्ये घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि हा "ट्रेलर" असल्याचे सांगत इशारा दिला. पोलिसांनी सांगितले की, आयपी अॅड्रेस हा कॅनडातील असला तरी यामध्ये व्हीपीएनचा वापर झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून हा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 

रविवारी (14 एप्रिल 2024) मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले असून आरोपींचा चेहराही समोर आला आहे. एका आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती आहे. सलमान खानच्या घरावरील हल्ल्यात विशाल राहुल उर्फ ​​कालूचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे विशाल राहुल उर्फ ​​कालू?

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा विशाल राहुल उर्फ ​​कालू हा गुरुग्रामचा रहिवासी असल्याचे पोलिसांच्या डॉजियरमध्ये समोर आले आहे. कालूने दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्याच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली होती आणि त्याने माफी मागावी अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. याआधीही सलमान खानला जून 2022 मध्ये एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती.

हल्ल्यात वापरण्यात आलेली बाईक रायगडमधून खरेदी केली

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी  बाईक खरेदी केली होती. या दोन्ही आरोपींनी रायगड जिल्ह्यातून जुनी बाईक खरेदी केली होती असे तपासात समोर आले आहे. ही सेकंड हँड खरेदी केलेली बाईक घेऊन आरोपी मुंबईत दाखल झाले आणि गोळीबार केला. पोलिसांनी आता या बाईकच्या खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. 

गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी

गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते.  1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget