Singham 3 : 'सिंघम 3'मध्ये होणार भाईजानची एन्ट्री? लवकरच होणार शूटिंगला सुरुवात
Singham 3 : 'सिंघम 3' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.

Singham 3 : 'सिंघम' (Singham) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक 'सिंघम 3'ची (Singham 3) प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता रोहित शेट्टी (Rohit Shetty) 'सिंघम 3'मध्ये काय नवीन करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) असल्याचे म्हटले जात आहे.
'सिंघम 3'ची शूटिंग कधीपासून होणार सुरू?
'सिंघम 3' या सिनेमावर रोहित शेट्टीने काम करायला सुरुवात केली आहे. पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अजय सध्या एका सिनेमावर काम करत आहे. तसेच रोहित शेट्टीचा 'सर्कस' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
'सिंघम 3'मध्ये होणार सलमानची एन्ट्री?
गेल्या काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 15'च्या मंचावर रोहित शेट्टी आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी चुलबुल पांडे 'सिंघम 3'मध्ये कॅमियो करणार असल्याचे संकेत दिले होते. त्याआधीदेखील बिग बॉसच्या मंचावर 'सूर्यवंशी'चे प्रमोशन करतानादेखील त्याने यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामुळे सलमानचे चाहते त्याला 'सिंघम 3' या सिनेमात बघण्यासाठी उत्सुक आहेत.
'सिंघम 3' सिनेमासंदर्भात रोहित शेट्टी म्हणाला होता, 'सिंघम 3' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. तसेच या सिनेमाच्या शूटिंगला सात महिने लागणार आहेत. त्यामुळे 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. सिंघम सिनेमाचे प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळेच या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत".
संबंधित बातम्या
Satya Prem Ki Katha : 'भूल भुलैया 2'नंतर कार्तिक-कियाराची जोडी दिसणार 'सत्य प्रेम की कथा' सिनेमात; फर्स्ट लुक आऊट
Timepass 3 : 'टाइमपास 3' वादाच्या भोवऱ्यात; हिंदी राष्ट्राभाषा असल्याची खोटी माहिती दाखवल्याचा आरोप
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















