मुंबई : लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचा दबंग सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खानने तिथे आपल्या फार्महाउसमधूनच एक व्हिडीओ जारी करून लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरातच राहून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससंदर्भात लढण्याचं आवाहन केलं होतं.


याव्यतिरिक्त सलमान खानने पनवेल फार्म हाउसमध्ये राहून 'प्यार करोना' नावाच्या एका गाण्याचा व्हिडीओदेखील जारी केला होता. हे गाणं सलमान खानने स्वतः लिहिलेलं असून त्यानेच हे गाणं गाऊन कम्पोजदेखील केलं आहे.



सलमान खानच्या पनवेलमधील त्याच फार्म हाऊसमधून आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रूममधून राशन आणि खाण्या-पिण्याचं काही अत्यावश्यक सामान जवळच उभ्या असणाऱ्या एका बैलगाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत करत आहे. दरम्यान, सलमान खान पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी धावून आला आहे. सलमान ज्या फार्महाउसमध्ये राहत आहे. तेथील आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना राशन देऊन सलमानने मदत केली आहे.


याच व्हिडीओमध्ये सलमान खानच्या कुटुंबियांसोबत गर्लफ्रेंड उलिया वंतूर, अभिनेत्री आणि सलमानची खास मैत्रिण जॅकलीन फर्नांडीस या दोघीही दिसून आल्या. व्हिडीओच्या शेवटी आवश्यक सामान घेऊन सर्व बैलगाड्या फार्महाऊसमधून बाहेर जाताना दिसत आहेत.


दरम्यान, सलमान खान फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) चे 23000 मजूरांच्या अकाउंट्समध्ये थेट प्रति व्यक्ती 3 हजार रूपये याप्रमाणे एकूण 6.90 कोटी रूपयांची मदत केली होती. एवढचं नाहीतर मजुरांच्या खात्यात पैसे टाकण्याव्यतिरिक्त सलमानने या लॉकडाऊन दरम्यान, इंडस्ट्रीशी निगडीत गरीब मजुर आणि इतर गरजूनां अत्यावश्यक सामान आणि राशन पोहोचवलं होतं.


संबंधित बातम्या : 


बाबा एकदम ठीक, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीच्या अफवांबाबत मुलाचं ट्वीट


Coronavirus | वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनने गोळा केले 2500 PPE किट्स अन् लाखो रूपयांचा मदतनिधी


coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज