मुंबई : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. हा वाढता आकडा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. . या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. सध्या अनेक सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. बॉलीवूडचा दबंग खान देखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला असून या माध्यमातून आपल्या अंदाजात कोरोनाविषयी जनजागृती करत आहे. आता तर त्याने चक्क कोरोना व्हायरसवर एक गाणे बनवले असून हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आहे.


सलमानने आपल्या आवाजातील हे गाणे सोशल मीडिया आणि सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर पोस्ट रिलीज केले आहे. प्यार करोना असे या गाण्याचे बोल असून थोड्याच वेळापूर्वी सलमान संपूर्ण गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे हे गाणे सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून लिहिले आहे तर साजिद- वाजित यांनी गाण्याला संगीत दिले आहे. 'इमोशनली पास और फिजिकली दूर रहो ना, प्यार करोना, असे लिहीत सलमानने हे गाणे पोस्ट केले आहे.


सलमान इससे पहले 'मैं हूं हीरो तेरा', 'तू ही तू हर जगह' और 'हैंगओवर' सहित कई हिट गानों को लिख चुके हैं। एक्टिंग के अलावा उन्हें लिखने, गाने और पेंटिंग करने का भी शौक है। बता दें कि सलमान इस संकट की घड़ी में फिल्म इंडस्ट्री से जुड़े दिहाड़ी मजदूरों की भी मदद कर रहे हैं।

या गाण्याच्या माध्यमातून सलमान खानने आपल्या चाहत्यांना लॉकडाऊनमध्ये घरी काय काय करता येऊ शकते तसेच आपला वेळ अधिक खास कसा बनवू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त, त्याने आपल्या चाहत्यांना कुटुंबासमवेत वेळ घालण्याचा सल्लाही दिला आहे.सलमानने या अगोदर 'मैं हूं हीरो तेरा', 'तू ही तू हर जगह' या सारखे अनेक सुपरहिट गाणे लिहिले आहे. अभिनयाशिवाय सलमानला लिखाणाची, पेंटिंगची आवड आहे.

संबंधित बातम्या :

सलमान भडकला, म्हणाला काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय