मुंबई  : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि सलीम खान यांना मिळालेला धमकी पत्राचा उलगडा झाला आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या खास माणसाकडून धमकीचं पत्र (Salman Khan Death Threat)  पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  गँगस्टर विक्रम बराड  यानेच हे धमकीचं पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.


विक्रम बराड हा राजस्थानचा कुख्यात गुंड आहे. विक्रमवर 24 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. विक्रम हा राजस्थानचा रहिवासी आहे. विक्रम देशाबाहेर पळून गेल्याची पोलिसांना शंका आहे. बराडचे संबंध एनकाऊंटरमध्ये मारल्या गेलेला गँगस्टर आनंदपालचा भाऊ अनमोल याच्याशी असल्याची माहिती देखील समोर येत आहे


मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला धमकी  देण्यासाठी तीन लोक मुंबईला आले होते. हे तिघेही सौरभ महाकालला भेटले.  महाकालची मुंबई क्राईम ब्रान्च सहा तास चौकशी केली. या चौकशीत सलमान खानला धमकी ही गँगचा पब्लिसिटी स्टंट असल्याची माहिती दिली आहे. सलमान खानला धमकी पाठवणाऱ्या पत्राचा मास्टर माईंड विक्रमजीत सिंह बराड आहे. बराड हा हनुमानगड, राजस्थानचा आहे.
 
सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता, त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता.


संबंधित बातम्या :


Lawrence Bishnoi : सिद्धू मुसेवालाची हत्या असो, सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न; तुरुंगातून कारभार चालवतो 28 वर्षांचा 'लॉरेन्स बिष्णोई'!