Vikram 2 Update : लोकेश कनगराज दिग्दर्शित कमल हासन (Kamal Haasan) अभिनित ‘विक्रम’ (Vikram) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 3 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर त्याच्या सिक्वेलची चर्चाही जोर धरू लागली आहे. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘विक्रम’च्या पुढच्या भागात दाक्षिणात्य अभिनेता राम चरणची (Ram Charan) एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे.


‘विक्रम’च्या कथेत कमल हासन आपल्या नातवाच्या शोधात असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण, हा नातू चित्रपटात दाखवलेलाच नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार 'विक्रम'च्या पुढच्या भागात अभिनेता राम चरण, कमल हासनच्या नातवाची भूमिका साकारणार आहे. आता ‘RRR’ आणि ‘विक्रम’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटातील एकत्र येणार म्हणजे बॉक्स ऑफिसवर नक्कीच धमाल पाहायला मिळणार आहे.


चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!


‘विक्रम’ या चित्रपटाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'विक्रम' हा संपूर्ण पॅन इंडिया चित्रपट असून तो तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक मल्टिस्टारर असल्यामुळे या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या चित्रपटात कमल हासन, फहाद फासिल आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


पार केला 200 कोटींचा टप्पा!


लोकेश कनगराज दिग्दर्शित 'विक्रम' चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 'विक्रम' चित्रपट कमल हासनच्या करिअरमधला एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. रिलीजनंतर पाच दिवसांतच या चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतातदेखील हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे.


‘विक्रम 2’मधून होणार धमाल!


यापूर्वी अशी चर्चा रंगली होती की, कमल हासन 'विक्रम' या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती करत आहे, ज्यात अभिनेता सुर्या मुख्य भूमिकेत असेल. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आजे की, लोकेश कनगराज लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे ज्यात कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसणार असून, सुर्या, कार्ती हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुर्याच्या कॅमिओ भूमिकेबरोबरच, 'विक्रम'च्या क्लायमॅक्समध्ये कार्तीच्या व्हॉईस ओव्हर नेरेशनने लोकेश कनगराजच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. आता या चित्रपटात राम चरण देखील दिसणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने चाहत्यांना आनंद द्विगुणित झाला आहे.


संबंधित बातम्या


Vikram Box Office Collection : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई


Trending Post : अमूलने डूडलद्वारे साजरे केले 'विक्रम'चे यश! बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई