एक्स्प्लोर
मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची
![मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची Salman Khan Clashes With Mumbai Airport Officials मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/18161825/salman-15-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद झाला असल्याचे वृत्त समजतं आहे. सलमान विस्तारा एअरलाइन्सच्या विमानानं दिल्लीला रवाना होत असताना त्याची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली.
सलमान खान 15 मिनिटं उशीरा एअरपोर्टवर पोहचला. उशीरा पोहचल्यानं सलमानला विमानात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे दबंग सलमान भलताच भडकला आणि त्याने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.
यानंतर सलमान खानला बराच वेळ वेटिंग रुममध्ये बसावं लागलं. त्यानंतर त्याला दुसऱ्या विमानानं दिल्लीला रवाना करण्यात आलं.
दरम्यान कालच सलमान खाननं सानिया मिर्जाच्या पुस्तकाचं अनावरण केलं. त्याचवेळी त्याने आपल्या खासगी आणि कौटुंबिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या.
![मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/18161828/salman-23.jpg)
![मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/18161830/salman-34.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)