Salman Khan Dance In Arbaaz- Shura Wedding: अभिनेता अरबाज खानने (Arbaaz khan) रविवारी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Shura Khan) लग्न केले. अरबाज आणि शूराच्या लग्नाला अरबाजचा मोठा भाऊ सलमान खानसह संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होते. सध्या अरबाजच्या लग्ना सोहळ्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये सलमान खान (Salman Khan) त्याच्या भावाच्या लग्नात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.


भाईजानचा जबरदस्त डान्स


अरबाज खानच्या लग्नासाठी सलमान खाननं सिल्व्हर कलरचा कुर्ता आणि ब्लॅक शूज असा लूक केला होता.   सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या  अरबाज खानच्या लग्नातील व्हिडीओमध्ये मोठा भाऊ सलमान खान दबंग चित्रपटातील 'तेरे मस्त मस्त दो नैन' या गाण्यावर आणि टायगर जिंदा है या चित्रपटातील  दिल दियां गल्लां या गाण्यावर डान्स करताना दिसला. या व्हिडीओमध्ये सलमानचा पुतण्या अरहान खान आणि सलमानची वहिनी शूरा हे देखील डान्स करताना दिसले.


पाहा व्हिडीओ:






अरबाजचा मुलगा अरहाननं लग्नसोहळ्याला लावली हजेरी


अरबाज खान आणि शुरा यांच्या लग्नात  अरबाजचा मुलगा अरहान खानही उपस्थित होता. लग्न सोहळ्यात अरहाननं देखील डान्स केला, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अरबाज खान आणि शुरा हे केक कट करताना दिसले. तर अरहान हा अरबाजच्या बाजूला उभा राहिलेला दिसला. रवीना टंडन, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा आणि फराह खान या सेलिब्रिटींनी देखील अरबाज आणि शूरा यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली.






अरबाज खाननेही शूरासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोंमध्ये अरबाज आणि शूरा यांचा रोमँटिक अंदाज दिसला. हे फोटो शेअर करताना अरबाज खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीत, मी आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे".


संबंधित बातम्या


Arbaaz Khan Wedding : मलायकासोबतच्या घटस्फोटानंतर 6 वर्षांनी अरबाज खान चढला बोहल्यावर; वयाच्या 56व्या वर्षी गर्लफ्रेंड शुरा खानसोबत बांधली लग्नगाठ