Uorfi Javed: उर्फी जावेद 

  (Uorfi Javed)   ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीच्या अतरंगी फॅशनचं अनेकजण कौतुक करतात तर काही लोक तिला ट्रोल करतात. सध्या उर्फी ही फॅशनमुळे नाही तर तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. उर्फीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेसचं काम करताना दिसत आहे.


उर्फीनं मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये केलं वेट्रेसचं काम


उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती  रेस्टॉरंटमध्ये आलेल्या लोकांची ऑर्डर लिहून घेताना दिसत आहे. तसेच ती काही लोकांना फूड सर्व्ह देखील करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीनं व्हाईट शर्ट आणि व्हाईट पँट त्यावर ब्लॅक एप्रन परिधान केलेलं दिसत आहे.


....म्हणून उर्फीनं वेट्रेसचं काम केलं


उर्फीनं कॅन्सर पेशंटला मदत करण्यासाठी वेट्रेसचे काम केलं आहे. उर्फीनं तिच्या रेस्टॉरंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्वप्न साकार झाले! कोणतेही काम मोठे किंवा छोटे नसते, ते सर्व दृष्टीकोनावर अवलंबून असते. मला काही तास वेट्रेसच्या शूजमध्ये राहायचे होते. कॅन्सर पेशंट एड असोसिएशनमध्ये माझ्या कमाईचे योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे"


पाहा व्हिडीओ:






सोशल मीडियावर होतोय कौतुक


उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "प्रत्येकजण तिच्या ड्रेसबद्दल बोलतो पण कोणालाच तिच्या दयाळू कृत्याची जाणीव झाली नाही. ती खूप दयाळू मुलगी आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "हे प्रेरणादायी आहे"


अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. उर्फीनं  दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या मालिकांमध्ये काम केलं आहे.बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. MTV Splitsvilla गेस्ट कंटेस्टेंट म्हणून देखील उर्फीनं सहभाग घेतला होता.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


VIDEO: वायर,काचा आणि पिझ्झानंतर आता माशी; उर्फीच्या अतरंगी ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा