एक्स्प्लोर
सलमान खान आणि विवेक ओबेरॉय मराठी चित्रपटात एकत्र?
मुंबई : काही वर्षांपूर्वी झालेल्या वादावादीनंतर बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यात विस्तव जात नाही. मात्र आता सलमान आणि विवेक एकाच चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. हा चित्रपट म्हणजे रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित 'छत्रपती शिवाजी' चित्रपट असल्याची माहिती आहे.
रितेशच्या 'छत्रपती शिवाजी' चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगल्या होत्या. रितेशच्याच 'लय भारी' चित्रपटात छोटीशी भूमिका केल्यानंतर पूर्ण लांबीच्या भूमिकेत सलमान दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. याला कुठलाही अधिकृत दुजोरा आलेला नसतानाच विवेकही रितेशच्याच चित्रपटात झळकणार म्हटलं जात आहे.
चित्रपटामध्ये विवेक आणि सलमान समोरासमोर येणारही नाहीत, त्यांची शूटिंग वेगवेगळी पार पडतील, मात्र या निमित्ताने दोघंही एकाच चित्रपटात दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विवेकने सलमानशी तडजोड करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र सलमानने मनोमीलन करण्यास नकार दिल्याचं म्हटलं जातं.
गेली काही वर्ष सलमान आणि विवेकमध्ये धुमसणारं शीतयुद्ध आता संपुष्टात येणार का, अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्याचप्रमाणे सलमान आणि विवेक मराठीत दिसणार का, याचंही कुतूहल चाहत्यांच्या मनात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement