Sakshi Tanwar Birthday : अभिनेत्री साक्षी तंवर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या कामाच्या जोरावर नाव कमावणाऱ्या दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. साक्षी तंवरचा आज 12 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. साक्षी तंवरने छोट्या पडद्यावर इंटिमेट सीन दिल्याने एकच खळबळ माजली होती. यानंतर तिच्या वडिलांनी कोस्टारला फोनही केला होता. तिच्या आयुष्यातील काही रंजर गोष्टी जाणून घ्या.
लिपलॉक अन् 17 मिनिटांच्या इंटिमेट सीनमुळे खळबळ
अभिनेत्री साक्षी तंवरचा जन्म राजस्थानमधील अलवर येथे 12 जानेवारी 1973 रोजी झाला. साक्षी तंवरने 2001 मध्ये 'करम' या मालिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर, तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. संसार, कुटुंब आणि धडक सारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये ती झळकली. पण साक्षी तंवरला खरी प्रसिद्धी 'बडे अच्छे लगते हैं' मालिकेमधून मिळाली. या शोमध्ये साक्षीच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिने शोमध्ये राम कपूरसोबत 17 मिनिटांचा लिपलॉक देऊन खळबळ उडवून दिली होती. टीव्ही शो व्यतिरिक्त, साक्षी चित्रपटांतही झळकली आहे. साक्षी आमिर खानच्या दंगल चित्रपटात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. ज्यामध्ये तिने उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली.
इंटिमेट सीनमुळे मोठा वाद
'बडे अच्छे लगते हैं' मालिकेतील लीड कपल राम कपूर आणि साक्षी तंवरची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या ऑनस्क्रिन कपलपैकी एक आहे. या शोमध्ये साक्षी आणि राम यांनी लिपलॉक केला होता आणि 17 मिनिटांचा इंटिमेट सीनही दिला होता. टीव्हीवर अशाप्रकारचा इंटिमेट सीन पहिल्यांदाच दाखवण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. या इंटिमेट सीनमुळे मोठा वाद निर्माण झाल्याने राम कपूरला माफी मागावी लागली होती आणि साक्षीच्या वडिलांनी त्याला फोन केला होता, अशीही माहिती आहे.
साक्षीच्या वडिलांचा राम कपूरला फोन
17 मिनिटांच्या इंटिमेट सीननंतर अभिनेत्री साक्षी तंवरच्या वडिलांनी अभिनेता राम कपूरला फोन केला होता. एका मुलाखतीत राम कपूरने याबाबत माहिती दिली होती. राम कपूरने सांगितलं होतं की, "या सीननंतर साक्षीच्या वडिलांना मला फोन केला होता, तेव्हा मला चांगलं वाटलं. त्यांनी म्हटलं की, राम तू आहेस, तर मला विश्वास आहे." या सीन आधी राम कपूरनेही त्याच्या पत्नीची परवानगी घेतली होती. या सीनमुळे एकता कपूरलाही माफी मागावी लागल्याचं रामने सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :