Sonu Sood On Munni Badnaam Hui Song : बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या फतेह या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने मुख्य नायकाची भूमिका केली आहे. विशेष म्हणजे त्याने हा चित्रपट दिग्दर्शितही केलाय. त्यामुळेच हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान, त्याने दबंग या चित्रपटातील एका रंजक घटनेबाबत सांगितलं आहे. या चित्रपटातील 'मु्न्नी बदनाम हुई' या गाण्यामुळे तो सलमान खानवर चांगलाच भडकला होता. 


सोून सूदने सांगितल्या दबंग चित्रपटाच्या आठवणी


सध्या सोनू सूद त्याच्या फतेह या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 10 जानेवारी जोजी चित्रपटगृहांत आलेला आहे. त्याने नुकतेच यूट्यूबर शुभंकर मिश्राच्या एका पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्याने वेगवेगळ्या घटनांची माहिती दिली. याच पॉडकास्टमध्ये सोनू सूदने दबंग या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तो सलमान खानवर नाराज झाला होता. 


सोनू सूदने व्यक्त केली होती नाराजी


दबंग चित्रपटात काम करताना सोनू सूदने माझ्यासाठी एखादं गाणं असावं अशी विनंती दिग्दर्शक अनुराग कश्यपला केली होती. चित्रपटात एखादे आयटम साँग असेल तर त्यात मला संधी दे, असे सोनू सूद म्हणाला होता. ही विनंती नंतर कश्यपनेही मान्य केली होती. त्यानंतर मु्न्नी बदनाम हुई या गाण्यात फक्त सोनू सूद दिसणार होता. मात्र ऐनवेळी त्या गाण्यात सलमान खानदेखील आला. यावरच सोनू सूदने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.   


चित्रपटात माझं एकच गाणं आहे, त्यातही तू...


त्यानंतर सोनू सूदने सांगितले की,  'चित्रपटात मु्न्नी बदनाम हुई हे गाणे टाकण्याचे ठरले. या गाण्याचे कोरिओग्राफिंग फराह खान करत होती. गाणं हिट करणारी एखादी स्टेप असू देत, असं मी फराहला सांगितलं होतं. या गाण्याच्या शूटिंगच्या दोन ते चार दिवसांधी या गाण्यात सलमान खानदेखील असेल, असं मला अभिनवने सांगितलं.  त्यावर हे गाणं माझं आहे. त्यात सलमान खान कसा येऊ शकतो, असं मी त्याला विचारले. त्यावर गाणे चालू असतानाच सलमान खान हा रेड मारेल. त्याला मी आक्षेप घेतला. या चित्रपटात माझं एकच गाणं आहे. त्यातही तू असं का करतोय, असं मी कश्यपला विचारलं होतं, अशी आठवण सोनू सूदने सांगितलं. 


दरम्यान, नंतर हे गाणे चांगलेच हिट ठरले. अजूनही हे गाणे लोक आवडीने पाहतात. तसेच गाण्याच्या स्टेप्स अजूनही लोक आवडीने करतात. 


हेही वाचा :


अभिनेत्री रश्मिका मंदाना जखमी, पायाला मोठी दुखापत झाल्याने सिकंदर चित्रपटाचे शूटिंग खोळंबले!


आश्चर्यम्! स्पेशल रुम, स्वत:चं नावही दिलं, कार्तिक आर्यनच्या क्युट पेट डॉगचे लाखो दिवाने, भारी थाट एकदा पाहाच