Fatima Sana Shaikh Story : 'दंगल' फेम बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हिचा आज 11 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. फातिमाने दंगल चित्रपटातील दमदार भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. अनेकांना माहिती नसेल, पण फातिमाने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती दंगल चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. याच चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. तिच्या आतापर्यंतच्या संघर्षमय प्रवासाबद्दल जाणून घ्या.


बालकलाकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण


फातिमाचा जन्म 11 जानेवारी 1992 रोजी हैदराबाद येथे झाला. फातिमाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फार कमी लोकांना माहिती असेल की फातिमा ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्या 'चाची 420' चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात तिने कमल हसनच्या मुलीची भूमिका साकारली होती. 


वडील हिंदू असूनही फातिमा पाळते इस्लाम धर्म


मोठी झाल्यानंतरही फातिमा सना शेखने फिल्म इंडस्ट्रीमध्येच करियर करण्याचा मार्ग निवडला. त्यानंतर सहा ऑडिशन दिल्यानंतर एका ऑडिशनमध्ये तिची निवड झाली आणि आमिर खानच्या ब्लॉकबस्टर 'दंगल' चित्रपटामधून तिला प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री फातिमा सना शेखचे वडील हिंदू आहेत. फातिमाच्या वडिलांचे नाव विपिन शर्मा आहे. फातिमाची आई मुस्लिम आहे. तिच्या आईचे नाव राज तबस्सुम आहे. फातिमा तिच्या वडिलांच्या धर्मावर विश्वास ठेवत नाही आणि तिच्या आईच्या धर्माचे पालन करते.


आमिर खानसोबत जुडलं नाव (Who is Aamir Khan Girlfriend?)


आमिर खान पुन्हा एकदा त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे आणि त्याच्या अफेअरमुळे चर्चेत राहिला आहे. आमिर खानची एक्स वाईफ रीना दत्ताच्या वडिलांच्या निधनानंतर अनेक जण तिते सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी आमिर खानही त्याची आई झीनत हुसेनसोबत रीना दत्ताच्या घरी पोहोचला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झाले होते. यावेळी सर्वांच्या नजरा फक्त आमिर खानची रुमर्ड गर्लफ्रेंड फातिमा सना शेखवर होत्या. दंगल चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारणारी फातिमा सना शेख हिचे नाव अनेकदा आमिर खानशी जोडले जातं.






बाल कलाकार म्हणून करियरला सुरुवात


फातिमा सना शेखने त्याने 'बडे दिलवाला', 'खुबसूरत' आणि 'वन 2 का 4' सारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. 2016 मध्ये आलेल्या नितेश तिवारी दिग्दर्शित आमिर खानच्या दंगल चित्रपटात कुस्तीपटू गीता फोगटच्या भूमिकेमुळे ओळख मिळाली. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत आमिर खान आणि किरण राव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2000 कोटींपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


टॉप अभिनेत्रीचा प्रसिद्ध उद्योगपतीवर लैंगिक शोषणाचा आरोप, ज्वेलरी बिझनेसमन अटकेत