Pushpa 2 Box Office Collection Day 38: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) प्रदर्शित होऊन 38 दिवस झाले आहेत आणि हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे. 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं एकामागून एक अनेक विक्रम मोडले आहेत. 10 जानेवारी रोजी राम चरणचा (Ram Charan) गेम चेंजर (Game Changer) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवरुन आपला गाशा गुंडाळेल, असं मानलं जात होतं. पण हार मानेल तो पुष्पा कसला? पुष्पा 2 च्या पारड्यात रिलीजच्या 38 व्या दिवशीही लोकांनी भरभरून दान टाकलं आहे.
पुष्पा 2 : द रूल सगळ्यांना पुरून उरणार
खरं तर, पुष्पा 2 ने काल, म्हणजे 37 व्या दिवशी, आजपर्यंतचा सर्वात कमी एका दिवसाचं कलेक्शन केलं आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, पुष्पा 2 नं फक्त 1.15 कोटी रुपये कमवू शकला. याचं कारण राम चरणचा नवा हाय ऑक्टेन अॅक्शन चित्रपट गेम चेंजर असल्याचं मानलं जात होतं, ज्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी भारतात 51 कोटींचा गल्ला केला होता.
याशिवाय, सोनू सूदचा 'फतेह'सुद्धा गेम चेंजरसोबत रिलीज झाला होता. 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं पहिल्या दिवशी 2.4 कोटी रुपये कमावले. हे सर्व पाहिल्यानंतर, चित्र असं होतं की, पुष्पा 2 लवकरच सिनेमागृहांमध्ये कमकुवत कमाईकडे वाटचाल करू लागेल, पण नेमकं उलट घडलं. पुष्पा 2 च्या कमाईत झालेली वाढ गेम चेंजरपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं.
पुष्पा 2 विरुद्ध गेम चेंजर: पुष्पाच अव्वल
शुक्रवारी 'पुष्पा 2' ने 1.15 कोटी रुपये आणि 'गेम चेंजर'नं 51 कोटी रुपये कमावले होते. आज शनिवार आहे आणि सुट्टीचा काळ असल्यानं दुसऱ्या दिवशी चित्रपटाला जास्त प्रेक्षक मिळतील, असा विश्वास आहे. पण हा फायदा गेम चेंजरमध्ये नाही तर पुष्पा 2 मध्ये दिसून आला. पुष्पा 2 नं आज 2 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. म्हणजेच, चित्रपटाच्या कलेक्शन टक्केवारीत सकारात्मक वाढ झाली आहे. पण गेम चेंजरच्या बाबतीत असं घडलेलं नाही. जर आपण गेम चेंजरच्या पहिल्या दिवशी आणि आजच्या कमाईच्या टक्केवारीवर नजर टाकली तर, ती 50 टक्क्यांपर्यंतही पोहोचलेली नाही. या चित्रपटानं आतापर्यंत फक्त 21.5 कोटी रुपये कमावले आहेत.
'पुष्पा 2'चं आतापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन
पुष्पा 2 नं आतापर्यंत म्हणजे, रात्री 10.35 वाजेपर्यंत भारतात 2 कोटींची कमाई केली आहे. फिल्मची आतापर्यंतची एकूण कमाई 1218.15 कोटी रुपये होती. सॅकनिल्कवर उपलब्ध असलेली आकडेवारी आतापर्यंत फायनल नाही. यामध्ये आता बदल होऊ शकतो. फिल्मचं वर्ल्डवाईल्ड कलेक्शन देखील 1800 कोटींच्या वर पोहोचू शकतो.