एक्स्प्लोर
नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटामुळे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु रातोरात स्टार बनले. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे होतात. मात्र याचा फटका त्यांच्या खासगी आयुष्यालाही बसत आहे. आकाशच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगवर याचा परिणाम जाणवत आहे.
महेश मांजरेकर यांच्या 'FU' या आगामी सिनेमात आकाश ठोसर काम करत आहे. सिनेमाची शूटिंग महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु आहे. परंतु चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलिस बंदोबस्तात राहावं लागत आहे.
'सैराट' परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरु
'FU' च्या सेटवर आकाश आहे, याची कुणकुण लागू नये, याचा सर्वतोपरी प्रयत्न सिनेमाची टीम करत आहे. मात्र आकाश जिथे जातो, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी लोटते. त्यामुळे आकाशसोबत शूटिंग करणं अतिशय अडचणीचं बनल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. PHOTO : 'सैराट' परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरु 'FU' हा तरुणाईचा चित्रपट असल्याचं महेश मांजरेकर सांगतात. "सिनेमाच्या नावातच सर्वकाही आहे. याच्या इनिशियल्समधून त्याचा अर्थ उघड होतो. मात्र सेन्सॉर बोर्डासाठी या सिनेमाचं नाव 'फन अनलिमिटेड' आहे. आम्हाला वाद नकोय," असं मांजरेकर उपहासाने म्हणाले.आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























