एक्स्प्लोर
Advertisement
आठवलेंच्या आयुष्यावर चित्रपट, नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन?
रामदास आठवले यांच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती होणार असून त्याचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करण्याची शक्यता आहे
मुंबई : 'सैराट', 'फँड्री' यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची शक्यता आहे. हा चित्रपट म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आयुष्याची कहाणी असेल, असं म्हटलं जात आहे.
वाईटावर विजय मिळवणारा, दलितांवरील अॅट्रोसिटीविरोधात लढणारा आणि एक प्रभावी नेतृत्व म्हणून सर्वांसमोर येणाऱ्या एका व्यक्तीचा प्रवास 'पँथर'मध्ये दिसणार आहे. लढा, आंदोलन, जबाबदारी, शांतता यांचं मिश्रण या चित्रपटात दिसेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मिळालेलं यश या सिनेमातून अधोरेखित होणार आहे.
'हा फक्त माझ्या एकट्याचा आयुष्यपट नाही. दलितांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. पँथर चित्रपटाचा नायक बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर तो चालतो. दलितांच्या हक्कांसाठी लढतो. चित्रपटातून भारतीयांच्या विचारांना दिशा मिळेल' अशा आशा आठवलेंनी व्यक्त केली.
नागराज मंजुळे यांच्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यासाठी बोलणी सुरु आहे. राकेश टाक निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. 'हा फक्त राजकीय-सामाजिक चित्रपट नसेल, तर मनोरंजनात्मक सिनेमा असेल. 'सैराट' दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बातचित सुरु आहे' असं टाक यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement